जैसे ज्याचे कर्म तैसे...! मगरीला कोंबडी भरवायला गेला अन् पहा कसा क्षणातच डाव पलटला; पाण्याचा राक्षसाचा थरारक Video Viral
सोशल मीडियावर जुगाड, स्टंट, अपघात असे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात आणि यासहच इथे वन्य प्राण्यांची संबंधित देखील काही व्हिडिओज शेअर केले जातात ज्यात अनेक धोकादायक पण मजेदार अशी दृश्ये पाहायला मिळतात. शिकारीचे अनेक थरार इथे व्हायरल होत असतात पण आता मात्र इथे एक अनोखे दृश्य दिसून आले आहे ज्यात व्यक्तीला आपला अतिशहाणपणा चांगलाच नडल्याचे दिसून आले आहे. वास्तविक घडतं असं की, व्यक्ती एक अख्खी कोंबडी घेऊन पाण्यात पोहणाऱ्या मगरीजवळ जातो आणि मोठ्या माजात ही कोंबडी त्याला भरवण्याचा प्रयत्न करतो पण मगर शेवटी पाण्याचा राक्षसचं तीच काय त्या लहानश्या कोंबडीने मन भरत नाही आणि मग ती क्षणाचाही विलंब न करता लगेच व्यक्तीवरच पलटवार करत हल्ला चढवते. व्हिडिओत खरा ट्विस्ट इथेच येतो आणि पुढे काय घडते ते आता आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक भलीमोठी काळी मगर पोहत असल्याचे दिसून येते आणि याच वेळी एक माणूस मगरीला कोंबडी भरवायला येतो. तो मगरीच्या तोंडात कोंबडीचे मांस घालतो, पण मगरी ते मांस खाली फेकून देते कारण तिची नजर त्या माणसावर असते, कोंबडी आणि माणसामध्ये ती माणसाच्या शिकारीची निवड करते आणि वेगाने व्यक्तीच्या दिशेने धाव घेते. मगरीला असे आपल्या दिशेने पळत आल्याचे पाहून माणूसही घाबरतो आणि लगोलग मागे उलटे पाय घेऊन पळू लागतो, पण चिखलामुळे तो घसरतो आणि खाली पडतो. त्याला खाली पडल्याचे पाहून मगर संधीचा फायदा उचलू पाहते आणि त्याचा पाय पकडण्याचा प्रयत्न करते. पण सुदैवाने माणसाच्या मदतीसाठी तिथे दुसऱ्या व्यक्तीची एंट्री होते जो माणसाला खेचत मगरीच्या तावडीतून बाहेर काढतो ज्यामुळे या जीवघेण्या हल्ल्यातून तो सुखरूप बचावला जातो. मगर वेळीच शांत झाली म्हणून अन्यथा त्या माणसाचे जगणे कठीण झाले असते.
— Brutal Clips 🔞 (@Brutal_0s) August 12, 2025
हा व्हायरल व्हिडिओ @Brutal_0s नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भावाने त्याचा जीव वाचवण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मगर म्हणत असेल कोंबडी खाऊन मला कंटाळा आला, आज माणसाला खाऊन बघूया” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मगरीला खूप भूक लागली होती, एवढी छोटीशी गोष्ट पुरेशी ठरणार नव्हती”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.