(फोटो सौजन्य: X)
काळ आला होता पण वेळ आली नव्हती ही म्हण तर तुम्ही अनेकदा ऐकली असेल पण याचे जिवंत उदाहरण तुम्हाला आजच्या या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक आणि सर्वांना आश्चर्यचकित करणारे दृश्य वेगाने व्हायरल होत आहे ज्यात एका मुलीसोबत एक अनोखा चमत्कार घडून आल्याचे दिसून आले. वास्तविक घडतं असं की, एका मुलीचा ट्रकखाली अडकून मोठा अपघात घडतो, अशात तिचा या अपघातात जीव जातोय की काय असे वाटू लागते पण आश्चर्य तर तेव्हा घडते जेव्हा या भयानक अपघातातूनही मुलीचा जीव सुखरूप बाहेर पडतो. इतका मोठा अपघात आणि तरीही मुलीला काहीही होत नाही, हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. व्हिडिओत नक्की काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, यात चालू रस्त्यावरील काही दृश्ये दिसून येत आहे. रस्त्यावर प्रचंड वाहतुक कोंडी झाल्याचे दिसते ज्यामुळे वाहने हळूहळू पुढे जात आहेत. यातच एका स्कुटीवर एक मुलगी बसल्याचेही व्हिडिओत दिसते. मुलीची स्कुटी आणि त्याच्यामागे एक ट्रक असतो पण अचानक ट्रकचे नियंत्रण सुटते ज्यामुळे हा ट्रक मुलीसकट तिच्या स्कुतीलाही चिरडत पुढे जाऊ लागते. या घटनेमध्ये मुलगी ट्रकच्या खाली चिरडली जाते ज्यानंतर आता काय तिचा जीव वाचत नाही असेच सर्वांना वाटू लागते पण ट्रक पुढे जाताच आपल्याला एक अद्भुत चमत्कार घडताना दिसून येतो ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. घडतं असं की ट्रकखाली मुलगी जाते खरी पण पुढच्याच क्षणी जेव्हा ट्रक तिच्या अंगावरून पुढे निघतो तेव्हा ती सुखरूपपणे यातून बाहेर पडते. मुख्य म्हणजे इतका मोठा अपघात घडूनही तिच्या शरीरावर साधा एक ओरखडाही दिसत नाही. अपघाताचे हे अनोखे दृश्य आता सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत असून मुलगी आपल्या नशिबामुळे अपघातातून सुखरूप बाहेर पडली अशा प्रतिक्रिया व्हिडिओवर देत आहेत.
लगता है एक खरोंच भी नहीं आया लड़की को pic.twitter.com/ecp32xYjPq
— Hurr (@IAmHurr07) August 15, 2025
दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @IAmHurr07 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “स्कुटी तर नवीन घेता येईल, जीव वाचला हे महत्त्वाचे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “नशीब खूप मोठी गोष्ट आहे” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “यमराज झोपला होता म्हणून जीव वाचला”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.