Marathi girl singing Gavlan in Mumbai local goes viral on social media
मुंबई : मुंबईची जीवनदायनी असलेली लोकल रेल्वे सर्वांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. रेल्वेच्या वेळेवर लोकांचा दिवस अवलंबून असून मुंबईकरांसाठी ती अत्यंत महत्त्वाची आहे. ऑफिसमधील धकाधकीनंतर लोकलमधील क्षण अनेकांना सुखावतात. सध्या सोशल मीडियावर अशीच एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये एका मराठमोळ्या मुलीने गवळण गायली आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबई लोकलमध्ये भाज्या विकणाऱ्यांचे, पत्ते खेळणाऱ्यांचे आणि गाणी गाणाऱ्या अनेक चाकरमान्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. पण सध्या सोशल मीडियावर एका मराठी मुलगी गवळण गात असल्याचे यामध्ये दिसत आहे. तिचा हा संगीतमय प्रवास पाहून सर्वांनी या तरुणीचे कौतुक केले आहे. तसेच सोशल मीडियावर देखील नेटकऱ्यांनी तिचे कौतुक केले आहे. कमेंट करुन तिच्या कलेला दाद दिली आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जसे मुंबई शहर कोणासाठी थांबत नाही तशीच लोकल देखील कोणासाठी थांबत नाही. तिचे चक्र हे अविरतपणे सुरु आहे. यामध्ये धक्काबुक्की करुन जागा आणि गडबड तर असतेच. पण यामध्ये देखील सुखाचे क्षण शोधणारे अनेकजण असतात. या व्हायरल व्हिडिओमधील ही तरुणी हाच आनंद लुटत असताना दिसत आहे. तिने निळ्या रंगाची साडी परिधान केली असून मराठमोळा लूक केला आहे. तसेच ती आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का? ही गवळण म्हणत आहे. तिच्याकडे सर्वजण आश्चर्याने बघत आहेत.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाला असून फेसबुक या प्लॅटफॉर्मवर तो शेअर करण्यात आला आहे. सानिका कानसे या अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे. व्हायरल व्हिडिओ पोस्ट करुन कॅप्शनमध्ये, “आंब्याच्या झाडाखाली तू फुगडी खेळशील का? सानिकाताईनी गायली अप्रतिम गौळण असे लिहिले आहे. व्हिडिओला आतापर्यंत ७ हजारहून अधिक लाईक्स लाखो व्हूज मिळत आहेत.
व्हायरल न्यूज वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नेटकऱ्यांनी केला कमेट्सचा वर्षाव
नेटकऱ्यांनी यावर कमेंटसचा वर्षाव केला आहे. अनेकांनी यावर कौतुक केले असून शुभेच्छा दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, मराठ मोळी वेषात, मराठी मोळी गवळण, भजनी गृप मध्ये एकटी मराठी मुलगी. छान सुरात गायलीस ताई. चेहऱ्यावरील स्मित हास्य कायम राहो. खूप छान, मस्त, झकास. तर दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले आहे की, छान हं. गातात त्यांना चांगला प्लॅटफॉर्म द्या जेणेकरून खूप पुढे जातील, असे एक नेटकरी म्हणाले आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ताई तुमचे मनापासून आभार तुम्ही आपली संस्कृती पुढे नेत आहे धन्यवाद तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, मस्तच, अशीच आपली संस्कृती पुढे घेऊन जवो हेच शुभाशीर्वाद, अशी एका नेटकऱ्याने कमेंट केली आहे.