
ऑर्डर देण्यासाठी गेला, पण थेट फ्लॅटमध्ये ओढून डिलिव्हरी बॉयला केली बेदम मारहाण, मेरठमधील धक्कादायक प्रकाराचा Video Viral
काय आहे प्रकरण?
दाव्यानुसार, ही घटना मेरठच्या भावनगर पोलिस ठाण्यातील गंगा हाइट्स या बिल्डिंगमध्ये घडली आहे. बिल्डींग मधील एका रहिवाशाने ऑनलाइन सामानाची ऑर्डर दिली होती. ही ऑर्डर डिलिव्हर होण्यास उशीर झाल्याने व्यक्ती नाराज होता. अशात जेव्हा डिलिव्हरी बॉय सामान घेऊन आला तेव्हा व्यक्तीने त्याच्यावर हल्ला चढवला. त्याने आधी डिलिव्हरी बॉयला खरीपोटी सुनावली आणि मग दोघांमध्ये वाद सुरू झाला. काही वेळाने घरातून व्यक्तीची पत्नी बाहेर येताना दिसते. त्यांना भांडताना पाहून पत्नी डिलिव्हरी बॉयला घराच्या आत घेऊन जाण्याचा इशारा करते.
माहितीनुसार यानंतर दोघा पती-पत्नीने डिलिव्हरी बॉयला घरात नेऊन बेदम मारहाण केली. जवळच्या सीसीटीव्ही कॅमेरात ही घटना कैद झाली असून युजर्सने यावर आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. जरा उशीर झाला म्हणून मारहाण करणे हा काही उपाय नाही. डिलिव्हरी बॉयच्या नजरेने पाहिल्यास दिवसभरात अनेक ऑर्डर डिलिव्हर करत असताना एका ठिकाणी उशीर होण स्वाभाविक आहे अशात जोडप्याने केलेले कृत्य नक्कीच माणुसकीला काळीमा फासणारे ठरते.
Delivery Agent Allegedly Assaulted Over Delayed Order A delivery agent in Meerut, Uttar Pradesh, was allegedly assaulted by a resident of Ganga Heights after his order was reportedly delayed. Following a brief verbal confrontation, the man allegedly attacked the delivery agent pic.twitter.com/m4mGFIjj7C — Pooja Talwar (@PoojaTalwar21) August 14, 2026
या घटनेचा व्हिडिओ @PoojaTalwar21 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील दृष्ये पाहून यूजर्स संतापले असून अनेकांनी या घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “या फुटेजच्या आधारावर दोघांवर कारवाई करायला हवी”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे, उशीर झाला म्हणून थेट मारहाण? खूपच चुकीचं आहे!”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “डिलिव्हरी बाॅयसोबत फार चुकीची वर्तवणुक केली जाते”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.