(फोटो सौजन्य: X)
काय आहे प्रकरण?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शूट करणारा व्यक्ती एका वृद्ध व्यक्ती जवळ जातो आणि त्यांना विचारतो की, या व्यक्तीने नेमकं काय केलं आहे प्रश्नाच्या उत्तरात वृद्ध सांगतो की त्याने चोरी केली आहे. यावर व्यक्ती पुन्हा प्रश्न करतो की जर त्याने चोरी केली आहे तर त्याला जेवण का खाऊ घातलं जात आहे. यावर यावर वृद्ध मिश्किल अंदाजात सांगतो की, याला काही झालं तर मग उत्तर कोण देणार? गावकऱ्यांचे हेतू हा असतो की एखादा व्यक्ती जर उपाशी असेल तर त्याला पोटभर खाऊ घाला आणि मग त्याची शिक्षा करा.
व्हिडिओतील संभाषणानुसार स्पष्ट झाले की गावकरी आधी चोराचे असं पोट भरणार म्हणजेच त्याला पोटभर खाऊ घालणार आणि मग चोरीबाबत त्याच्याशी चर्चा करणार. ही घटना बिहारच्या एका गावात घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. गावकरी आधी चोराला खाऊ घालणार मग त्याच्याकडून चोरीचे कारण जाणून घेणार आणि यावरही जर त्याने काही सांगितले नाही तर मग त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. ही घटना सध्या सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत असून युजरने यावर आपल्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहत.
Chor hai to kya ek type ka mehman hai . Full khatirdari 😭🤣 pic.twitter.com/lfLLHJyxal — Byomkesh (@byomkesbakshy) August 13, 2026
या घटनेचा व्हिडिओ @byomkesbakshy नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर ट्रेंड करत असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “गावकरी जरा जास्तच चांगले निघाले”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही व्यक्ती ज्याप्रकारे अन्न खात होती, त्याला भूक लागली होती आणि त्याने भूकेसाठी चोरी केल्याचे वाटते. देशातील गरिबी अजूनही त्या पातळीवर आहे, जिथे काही लोकांना पुरेसे अन्न मिळत नाही”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मला वाटतं त्याला त्याच्या चुकीचा पश्चाताप झाला होता म्हणून तो रडत होता”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

