(फोटो सौजन्य: Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मध्य प्रदेशच्या इंदाेरंमधील चंदन नगर आणि नगीन नगर परिसरातून समोर येत आहे. व्हायरल होत असलेल्या दाव्यानुसार, पतीने आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहिल्यानंतर रस्त्यावर मोठा गोंधळ घालायला सुरुवात केली ज्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी जमली. व्हिडिओ समोर येताच, सोशल मीडिया यूजर्स त्यातील दृष्ये पाहून थक्क झाले आणि लोकांनी वेगाने व्हिडिओला शेअर करण्यास सुरुवात केली.
सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत आपल्याला रस्त्यावरचे काही दृष्य दिसून येते. भररस्त्यात पती आपल्या पत्नीला बेल्टने मारहाण करत होता तर पत्नी त्याला रोखण्याचा प्रयत्न करत होती. त्यांच्या लग्नाला १२ वर्षे झाल्याचे सांगण्यात येत आहे. १२ वर्षांच्या संसारानंतर पत्नीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत अफेअर सुरु आहे हे समजल्यानंतर पतीला राग आला आणि त्याने संतापात तिला मारहाण करण्यास सुरुवात केली. हा संपूर्ण ड्रामा पाहण्यासाठी आजूबाजूला लोकांची गर्दी देखील जमते पण एकही व्यक्ती त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेताना दिसून येत नाही.
या घटनेचा व्हिडिओ @Indore HD नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर ट्रेंड करत असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओतील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “वाद काहीही असो, भररस्त्यात मारहाण करणं चुकीचंच आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्हिडिओ पाहून प्रश्न पडतो, आजूबाजूचे लोक मदतीला का आले नाहीत?”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “लोक तमाशा पाहत राहिले, पण कोणी भांडण थांबवण्याचा प्रयत्न केला नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.



