
Mirumi doll
Chinese Trump चा हा व्हिडिओ पाहिला का? बोलण्याची स्टाईल पाहून तुम्हीही डोकं खाजवाल, Video Viral
ही Mirumi डॉल केवळ एक शोभेची वस्तू नाही, ही डॉल एक जिंवत बाहुली आहे. जेव्हा तुम्ही ही डॉल तुमच्या बॅगला लावता तेव्हा ती आसपास आपले मान वळून गोष्टींचे निरीक्षण करते. कोणी जवळ आले, तिला हात लावला तर लाजते. तिला गोंजरले तर ती मान हालवून होकार देते. लबुबु ही थोडी भयानक आणि राक्षसी डॉल होती. परंतु मिरुमी दिसायला अतिशय गोंडस आणि निरागस आहे. या डॉलला चार्जही करता येते. अगदी कोआला या प्राण्यासारखी ही डॉल दिसते. या डॉलमध्ये काही विशिष्ट सेन्सर्स आणि अल्गोरिदमचा वापर करण्यात आला आहे. जेणेकरुन ही मानसाच्या भावनांशी जोडली जाईल. रोबो चार्म, चार्म डॉल म्हणून हीला ओळखले जात आहे.
या डॉलचे केस मऊ, मोठे डोळे आणि तिच्या निरागसतेमुळे लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. मानवी भावनांशी जोडली गेलील टेक्नॉलॉजी लोकांच्या पसंतीस पडत आहे. सध्या ही डॉल जपान आणि काही ठराविक देशांमध्ये उपलब्ध असून याची किंमत ६,००० ते ११,००० हजार आहे. या डॉलची भारतातही मागणी प्रचंड वाढत आहे. याचे अनेक व्हिडिओ फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे लबुबु डॉलने २०२५ मध्ये लोकांना वेड लावले होते. तसेच ही रोबो डॉल देखील लोकांना आपल्या प्रेमात पाडत आहे.
व्हिडिओ
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.