‘ये तो देव माणूस निकला रे’, महिलेने Blinkit वरून मागवलं Rat Poison ; डिलिव्हरी बॉयने केलं असं काही..., Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, एका महिलेने मध्यरात्री ब्लिंकइटवरुन रॅट पॉइझन मागवले होते. परंतु ही ऑर्डर मिळाल्यानंतर जे घडलं ते सध्याच्या बदलत्या काळात अविश्वासार्हच म्हणायचे. या व्हिडिओतून माणुसकीचा प्रत्यय आला आहे. विषारी औषधाची ऑर्डर मिळाल्यानंतर डिलिव्हरी बॉयला महिला डिप्रेशनमध्ये असल्याचे जाणवलं.
त्याने नियमांपलीकडे जात महिलेला पॉइझन देण्यास नकार दिला. याउलट त्याने महिलेशी शांततेने संवाद साधला. महिला मानसिकदृष्ट्या त्रस्त होती. आपले जीवन संपवण्यासाठी तिने हे विषारी औषध मागवले होते. तरुणाचे हे लक्षात येताच त्याने तिला धीर दिला, तिला शांत आणि मन हलकं होईल अशा शब्दांत समाजावून सागतिले की ती स्वत:ला इजा पोहोचवू नये. यानंतर महिलेने ऑर्डर कॅन्सल केली. डिलिव्हरी बॉयने हा सर्व घडलेला प्रकार एका व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केला आहे.
व्हायरल व्हिडिओ
A woman ordered rat poison at midnight. Blinkit delivery agent sensed she was distressed and in tears. He refused to deliver the order. He spoke to her with care, discouraged her from harming herself, and cancelled the order ❤️ pic.twitter.com/I0qaVApgL5 — News Algebra (@NewsAlgebraIND) January 9, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लटफॉर्म एक्सवर @NewsAlgebraIND या अकाऊंटवर वृत्तसंस्था NewsAlgebra ने शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वत्र चर्चेचा विषय ठरला असून लोक डिलिव्हरी बॉयचं कौतुक करत आहेत. डिलिव्हरी बॉयच्या या कृत्याने सर्वांचे मन जिंकले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






