Chinese Trump चा हा व्हिडिओ पाहिला का? सोशल मीडियावर हास्याची लाट, Video Viral (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
चायनीज ट्रम्प
रायन हुबेहुब ट्रम्प यांच्या शैलीत चीनच्या रस्त्यांवर बोलताना दिसत आहे. त्याचा व्हिडिओ पाहून लोकही चकित झाले आहेत. रायन केवळ ट्रम्प यांच्या आवाजाचीच नक्कल करत नाही, तर तो त्यांचे हावभाव, आणि शब्दांचा वापरही चांगल्या पद्धतीने करत आहे. यामध्ये Tremendeous, Amazing यांसारखे शब्द ट्रम्प यांच्या आवाजात बोलत आहे. रायनची चिनमध्ये प्रचंड लोकप्रियता वाढली आहे.
रायनचे इन्स्टाग्रामवर लाखो फॉलोवर्स आहेत. त्याने आपल्या हुबेहुब नक्कलने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. रायन AFP ला दिलेल्या मुलाखतीत सांगतो की, हे सर्व तो ट्रम्प यांना चिडवण्यासाठी करत नाही. त्याचे हे कार्य केवळ लोकांना हसवण्यासाठी, चिनच्या खाद्यपदार्थ आणि संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी करतो. तसेच त्याने ट्रम्प यांना जगातील सर्वात मोठे एन्टरटेनर म्हटले आहे.
व्हायरल व्हिडिओ
VIDEO: 🇨🇳 🇺🇸 The viral ‘Chinese Trump’ drawing millions of views online Outstretching his hands in a signature Donald Trump pose, impersonator Ryan Chen mimics the US president’s voice and gestures with such accuracy that he has become a social media phenomenon with his videos… pic.twitter.com/x74dOtUUJH — AFP News Agency (@AFP) January 8, 2026
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर तुफान व्हायरल होत आहे. रायन चेनच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे. त्याची ट्रम्प यांची नक्कल करण्याची खास शैली, हातवारे, अचूक हावभाव लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. लोक त्याचे व्हिडिओ पाहून कौतुक करत आहे. एकाने तो खूपच चांगल्या प्रकारचे नक्कल करत असल्याचे म्हटले आहे. तसेच हा व्हिडिओ पाहून आता ट्रम्प मादुरोसारखे यालाही उचलतील असे म्हटले आहे. सध्या रायन चेन चिनमध्ये चायनीज ट्रम्प म्हणून ओळखला जात आहे.
Yuck! हातावर तंदुरी रोटी घेतली अन् त्यावर थुंकला, कुकचा किळसवाणा Video Viral, पोलिसांनी केली अटक
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






