(फोटो सौजन्य: X)
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये आपल्याला लोकांची गर्दी पाहायला मिळते. यात लक्षवेधी ठरते ती पतीची प्रतिक्रिया. मोठ्या प्रतीक्षेनंतर जेव्हा हरवलेली पत्नी अचानक डोळ्यांसमोर आली तेव्हा पतीला आपला आनंद गगनात मावेनासा झाला. अश्रूंनी भरलेले डोळे आणि चेहऱ्यावरील हावभाव त्याच्या मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त करत होते. पत्नीला पाहताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि पळत जाऊन तिची भेट घेतो. पत्नी रस्त्यावर वाईट बिकट अवस्थेत दिसते. तिथे पाय मातीने माखलेले असतात तर कपडे जुने झालेले असतात.
तीन महिन्यांची प्रतीक्षा
सोशल मिडियावर दिलेल्या माहितीनुसार, महिला साधारण तीन महिन्यांपासून बेपत्ता होती. असे म्हटले जाते की, ती मानसिक आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत होती. व्हिडिओमध्ये महिलेच्या बेपत्ता होण्याचे कारण स्पष्ट करण्यात आलं नाही तथापि पतीच्या प्रतिक्रियेने अनेक यूजर्सने भावूक केलं आहे. त्याची प्रतिक्रिया सांगते की, हे तीन महिने त्याच्यासाठी किती कठीण झाले असतील. आपल्या कुटुंबातील सदस्य बेपत्ता होणे साधी गोष्ट नाही. यामुळे कुटुंबावर मानसिक आणि भावनिक तणाव वाढतो. पत्नीसाठी पतीला रडताना आजवर फारसं कुणी पाहिलं नाही ज्यामुळे पतीची ही रिएक्शन आता सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत ठरत आहे.
மூன்று மாதங்களுக்கு முன்பு சற்று மன நலம் பாதிக்கப்பட்ட காணாமல் போன தனது மனைவியை கண்டதும் கட்டி பிடித்து அழும் கணவன் மனைவி மிது எவ்வளவு பாசம் வைத்துள்ளார் என்று தெரிகிறது pic.twitter.com/Ux7bmtxYa9 — rajini1980 (@rajini198022409) October 1, 2026
हा व्हिडिओ @rajini198022409 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओ इंटरनेटवर चांगलाच व्हायरल होत असून अनेक यूजर्सने व्हिडिओवर कमेंट्स करत यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. यात एका यूजरने म्हटले की, “तीन महिन्यांनंतर आपल्या व्यक्तीला पुन्हा पाहण्याचा हा क्षण खरंच भावूक करणारा आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काका ग्रीन फ्लॅग निघाले”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्यांचे दु:ख त्यांच्या डोळ्यातून स्पष्ट दिसत आहेत”.
टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.






