बापरे! एखाद्या माळेप्रमाणे माकडाने कोब्राला गळ्यात लटकवले, मादी साप मागूनच हे दृश्य पाहत राहिली; Video Viral
सोशल मीडियावर अनेक व्हिडिओज नेहमीच व्हायरल होत असतात. यात प्राण्यांचे व्हिडिओही सामील असतात. हे असे व्हिडिओ लोकांचे मनोरंजन करतात ज्यामुळे फार कमी वेळात ते व्हायरल होतात. आताही इथे प्राण्यांच्या जीवनाशी संबंधित असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक माकड एक कोब्राशी खेळताना दिसून आला. ज्याला पाहतच आपले हातपाय थरथर कापू लागतात, अहो, सिंह ज्याला पाहून दुरूनच आपली वाट बदलतो अशा किंग कोब्राला माकड आपल्या गळ्यात माळ बनवून लटकाताना दिसला. माकडाचा हा मजेशीर प्रकार पाहून तिथे बसलेली मादी सापही थक्क झाली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता वेगाने व्हायरल होत असून आता यात पुढे काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात माकड चालत चालत येतो. यावेळी त्याच्या समोर दोन साप बसलेले असतात. माकड त्यांना पाहतो आणि काही समजेल तितक्यातच त्यातील एका सापाला उचलतो आणि थेट आपल्या गळ्यात गुंडाळतो. त्याचे हे कृत्य सर्वांनाच थक्क करून टाकते. युजर्सच काय तर यावेळी तेथे उपस्थित दुसरा सापही थक्क होऊन जातो आणि एकटक त्या माकडाकडे बघत राहतो. व्हिडिओचा इथेच शेवट होतो. हे दृश्य पाहून लोक म्हणू लागले आहेत की, माकड हा निडर राजा आहे, जो दोन नागांमध्येही मस्ती करत आहे.
माकडाची बोल्ड स्टाईल आणि कोब्राचे ड्रामा पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. असे व्हिडिओ अनेकदा सोशल मीडियावर व्हायरल होतात, पण हे माकड सीन वेगळ्याच पातळीवरचे आहे. माकडाने नागालाही हरवले असे लोक म्हणत आहेत. हा व्हिडीओ केवळ भीतीदायकच नाही तर हसण्यानेही भरलेला आहे आणि तो व्हायरल होण्यामागचे हेच प्रमुख कारण आहे.
Here’s a video of a monkey wearing a snake as a necklace while a damn cobra is staring at it. pic.twitter.com/ojaUoByVpV
— Defiant L’s (@DefiantLs) September 24, 2024
माकडाच्या या पराक्रमाचा व्हिडिओ @DefiantLs नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘येथे एका माकडाचा व्हिडीओ आहे ज्याने साप गळ्यात घातला आहे यावेळी दुसरा कोब्रा त्याच्याकडे टक लावून पाहत आहे’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 3 लाखाहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स करत यावर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “तो एक शूर माकड आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या माकडाला त्याची अजिबात भीती नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.