(फोटो सौजन्य: Twitter)
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ते सांगता येत नाही. इथे दररोज अनेक नवीन आणि आश्चर्यकारक घटना व्हायरल होत असतात ज्यांना पाहताच आपण थक्क होऊ. लोक आपल्याला व्हायरल करण्यासाठी इंटरनेटवर अनेक नवनवीन प्रकार करू पाहतात. कधी कोणी विचित्र जुगाड करत तर कोणी भयानक स्टंट करू पाहत. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक व्यक्ती एक अजब-गजब स्टंट करताना दिसून येईल. व्यक्तीचा हा पराक्रम इतका अनोखा आहे की यातील दृश्ये पाहून तुम्ही डोक्याला हातच लावाल. चला काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
सोशल मीडियावर दररोज काहीतरी विचित्र आणि मजेदार व्हायरल होत आहे आणि यावेळी असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे जो पाहून लोक हैराण झाले आहेत. माणसाचा पराक्रम एवढा अद्भूत आहे की त्याला पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. यातील दृश्ये आता अनेकांना अचंबित करत असून यात तो चक्क हवेत गरागरा फिरताना दिसून आला. त्याचा हा प्रकार त्याला चक्कर आणेल की नाही माहित नाही पण तुम्ही मात्र व्हिडिओतील दृश्य पाहून नक्कीच चक्रावाल.
काय आहे व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक व्यक्ती खांबावर किंवा बांबूवर चढतो, नंतर पोटावर झोपतो आणि हळू हळू हालचाल करू लागतो. यानंतर तो त्या बांबूच्या टोकावर चढून हेलिकॉप्टरच्या पंख्याप्रमाणे गरागरा फिरू लागतो. त्याचे हे कृत्य पाहून आता लोक अचंबित झाले आहेत. एवढ्या उंचीवर जिथे आपण साधं उभं रह्ण्याचाही विचार करणार नाही तिथे हा व्यक्ती चक्क भयानक स्टंट करू पाहत आहे. लोकांचा व्यक्तीचा हा स्टंट चांगलाच थक्क करत असून हा व्हिडीओ नक्की कुठला आणि कधीचा आहे याची अधिकृत माहिती मिळालेली नाही. व्यक्तीच्या धाडसाची मात्र दाद द्यायला हवी कारण कोणताही सामान्य व्यक्ती असे करू शकत नाही.
Finally real Shaktiman spotted bro 😭 pic.twitter.com/QlddwA2rd6
— Vishal (@VishalMalvi_) February 27, 2025
या विचित्र स्टंटचा व्हायरल व्हिडिओ @VishalMalvi_ नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘शेवटी खरा शक्तीमान दिसला’ असे लिहिण्यात आले आहे. दरम्यान व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले असून अनेकांनी कमेंट्स यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हे धोकादायक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जग बदलत आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.