Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असताना, शरद पवार गटाच्या खासदाराचा खऱ्या वाघासोबत रॉयल वॉक; Video ने उडवली खळबळ

Nilesh Lanke Tiger Video: 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरू असताना शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांचा थेट खऱ्या वाघासोबत फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला असून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jun 21, 2026 | 05:21 PM
शरद पवार गटाच्या खासदाराचा खऱ्या वाघासोबत रॉयल वॉक (Photo Credit- Insta)

शरद पवार गटाच्या खासदाराचा खऱ्या वाघासोबत रॉयल वॉक (Photo Credit- Insta)

Follow Us
Follow Us:
  • ‘ऑपरेशन टायगर’ची जोरदार चर्चा सुरू असताना
  • शरद पवार गटाच्या खासदाराचा खऱ्या वाघासोबत रॉयल वॉक
  • Video ने उडवली खळबळ
Nilesh Lanke Tiger Viral Video: राजकारणात सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘ऑपरेशन टायगर’ (Operation Tiger) या शब्दाची प्रचंड गूंज पाहायला मिळत आहे. उद्धव ठाकरे गटाच्या ६ ते ७ खासदारांच्या संभाव्य बंडखोरीच्या पार्श्वभूमीवर हे ‘ऑपरेशन टायगर’ वेगाने चर्चेत आले आहे. मात्र, राजकीय वर्तुळात या आभासी ‘टायगर’ची चर्चा सुरू असतानाच, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नवनर्वाचित खासदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांचा एक अत्यंत धक्कादायक आणि थक्क करणारा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये खासदार लंके कोणत्याही राजकीय नेत्यासोबत नव्हे, तर थेट एका हिंस्त्र आणि जिवंत वाघासोबत फेरफटका मारताना दिसत आहेत.

गळ्यात दोरी अन् थेट डोळ्यात डोळे; खासदार लंकेंची ‘रॉयल वॉक’

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वाऱ्यासारख्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये खासदार निलेश लंके यांचा एक वेगळाच रांगडा आणि धाडसी अंदाज पाहायला मिळत आहे. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, निलेश लंके यांच्या हातात एक जाड दोरी आहे, ज्या दोरीचे दुसरे टोक थेट एका अवाढव्य वाघाच्या गळ्यात बांधलेले आहे. हा वाघ अत्यंत डौलात आणि डामडौलात पुढे सरकत आहे, तर खासदार लंके अत्यंत सावधगिरीने आणि आत्मविश्वासाने त्याच्या मागे चालत आहेत.


व्हिडिओच्या एका भागात जेव्हा वाघ एका ठिकाणी थांबतो, तेव्हा निलेश लंके थेट त्याच्या समोर जातात आणि काही क्षणांसाठी त्या खूंखार वाघाच्या डोळ्यात डोळे घालून पाहतात. हा थरार कॅमेऱ्यात कैद झाला असून नेटकऱ्यांचे याने लक्ष वेधले आहे.

Nagesh Patil Asthikar: ‘शिवसेनेतून शिवसेनेतच गेलोय, विचारधारा…’, नागेश पाटील आष्टीकरांनी फुटीमागचं खरं कारण केलं जाहीर

राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण

सध्याच्या अत्यंत संवेदनशील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर खासदार निलेश लंके यांचा हा व्हीडिओ समोर आल्याने अनेक राजकीय संकेत काढले जात आहेत. महायुतीकडून उबाठा गटाला खिंडार पाडण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ची चर्चा सुरू असताना, शरद पवारांचे कट्टर समर्थक आणि आक्रमक नेते म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निलेश लंकेंचा हा स्टंट केवळ एक योगायोग आहे की त्यामागे काही सुनियोजित प्रतिकात्मक राजकीय संदेश आहे, यावर आता राजकीय विश्लेषकांमध्ये मोठी चर्चा रंगली आहे.

‘ऑपरेशन टायगर’वर खोचक तंज?

काही राजकीय विश्लेषकांच्या मते, उद्धव ठाकरे गटात मलेली खळबळ आणि ‘ऑपरेशन टायगर’च्या वृत्तावर हा एक प्रकारचा टोमणा आहे. सोशल मीडियावरील कार्यकर्त्यांच्या दाव्यानुसार, या व्हिडिओच्या माध्यमातून विरोधकांना असा संदेश देण्याचा प्रयत्न केला गेला आहे की, “असली टायगर कोणासोबत आहे आणि त्याच्यावर कोणाचे नियंत्रण आहे, हे यावरून स्पष्ट होते.” हा व्हिडिओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे, निलेश लंके कोणत्या प्राणीसंग्रहालयात किंवा सफारीत गेले होते आणि तो कधी चित्रित करण्यात आला, याबाबतची अधिकृत माहिती अजून समोर आलेली नाही. परंतु, ठाकरे गटाच्या खासदारांच्या बंडखोरीच्या बातम्यांमध्ये निलेश लंकेंच्या या “ओरिजनल ऑपरेशन टायगर”ने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे.

ओमराजेंना परत आणण्यासाठी हालचाली? संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; राजकीय चर्चांना उधाण

Web Title: Mp nilesh lanke viral video with real tiger amidst maharashtra politics operation tiger

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 05:21 PM

Topics:  

  • Nilesh Lanke
  • tiger
  • viral video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.