(फोटो सौजन्य: Instagram)
कोण आहे हा व्यक्ती?
या व्यक्तीचे नाव आहे मुहम्मद कहरीमानोविच (Muhamed Kahrimanovic), तो आपल्या असाधारण शारीरिक ताकदीसाठी ओळखला जातो. त्याच्या याच काैशल्यामुळे त्याला हॅमरहँड असे नाव पडले आहे. याचा मराठीत अर्थ होतो लोखंडाचा हात… त्याच्या हाताच्या ताकद पाहता कुणालाही सुरुवातीला विश्वास बसत नाही. आपल्या याच हाताच्या मदतीने व्यक्तीने एकामागोएक तब्बल ५० साॅफ्ट ड्रिंक कॅन्स फोडून दाखवले आहेत. मुख्य म्हणजे असं करण्यासाठी त्याला फक्त २१ सेकंदाचा कालावधी लागला.
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात व्यक्तीच्या समोर एक दगडी कट्टा असून यावर काही सॉफ्ट ड्रिंक कॅन्स ठेवण्यात आले आहे. टायमर जसा स्टार्ट होतो तसा व्यक्ती एकामागोमग एक कॅन फोडायला सुरुवात करतो. आपल्या हाताच्या शक्तीने तो प्रत्येक कॅनचा चुराडा करतो आणि असं करताना त्याच्या चेहऱ्यावर एक रेषही येत नाही. २१ सेकंदात ५० कॅन फोडणे काही सोपे काम नाही. यासाठी केवळ हाताची ताकदच नव्हे, तर योग्य तंत्र, सराव आणि शारीरिक नियंत्रणाचीही आवश्यकता असते. ही घटना सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत असून यातील दृष्यांनी यूजर्सना अचंबित केलं आहे.
View this post on Instagram
‘त्या’ फोटोमुळे CISF जवानावर कारवाई! मेट्रोतील प्रकाराने उडाली खळबळ, Video Viral
हा व्हिडिओ @mr.hammerhand नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने तरुणाच्या अनोख्या पराक्रमावर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “खरोखरच अप्रतिम आहे; हे खरं आहे यावर माझा विश्वास बसतोय”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण या कारनाम्याच्या नादात कितीतरी साॅफ्ट ड्रिंक्स वाया गेल्या”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मला वाटतं त्याला साॅफ्ट ड्रिंक्स मुळातच आवडत नाहीत म्हणून आपला सर्व राग तो त्यांच्यावर काढतोय”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.