Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral

Train Viral Video : मुंबई लोकलमधील एका वादाचे रूप मारहाणीत झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. प्रवासी आणि दोन तृतीयपंथीयांमधील वाद पुढे शिगेला गेला आणि त्यांनी प्रवाशाला लाथाबुक्क्यांनी मारण्यास सुरुवात केली.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 22, 2026 | 11:53 AM
मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्....; Video Viral

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्....; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • लोकलमधील वादाचे रूप मारहाणीत; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल.
  • CCTVच्या मदतीने संशयितांचा शोध घेऊन रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले.
  • प्रवाशाशी झालेल्या बाचाबाचीनंतर घटना घडल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले.
मुंबईकरांची लाईफलाईन मानली जाणाऱ्या लोकल ट्रेनमध्ये अनेक घटना घडत असतात. अलिकडे इथे एक नवा गोंधळ शेअर करण्यात आला आहे. यात चालू रेल्वेत दोन तृतीयपंथीयांचा एका प्रवाशासोबत मोठा वाद पेटल्याचे दिसते. हा वाद पुढे इतका वाढतो की याचे हिंसेत रुपांतर होते. व्हिडिओमध्ये दोन तृतीयपंथी सीटवर बसलेल्या एका प्रवाशाला बेदम मारहाण करताना दिसतात. दोघेही इतके संतापलेले असतात की प्रवाशाच्या कानिशिलात ते सपासाप थप्पड मारु लागतात. यावेळी रेल्वे डब्यातील अन्य प्रवासी मात्र बघ्यांची भूमिका बजावत असतात. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

काका हवेत फायरिंग करायला गेले खरे पण बंदूक निघाली फुसकी; लोक म्हणाले, हा चायनीज नाही तर पाकिस्तानी माल

काय घडलं व्हिडिओत?

समोर आलेल्या माहितीनुसार, १९ जुलै रोजी या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला. व्हिडिओतील दृष्ये पाहता तो काही क्षणातच व्हायरल झाला ज्यानंतर RPF ने आपला तपास सुरु करुन लगेच रेल्वे स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज तपासाण्यास सुरुवात केली. कडक निगराणीखाली दादर सेंट्रल रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १२ वरून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

पोलिसांच्या चाैकशीत दोन्ही तृतीयपंथीयांने सांगितले की, माहिम-बांद्रा दरम्यान धावणाऱ्या रेल्वेत ते पैसै मागण्यासाठी रेल्वेच्या डब्यात चढले. यावेळी एका प्रवाशासोबत त्यांची बाचाबाची झाली. हे भांडण पुढे इतके वाढले की त्याचे मारामारीत रुपांतर झाले. रेल्वे अधिकाऱ्याच्या मते, ही घटना शासकीय रेल्वे आणि मुंबई सेंट्रलच्या परिसरात येते. तपासानंतर, पुढील कायदेशीर कारवाईसाठी त्या दोघांना शासकीय रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

GRP मुंबई सेंट्रलने दोघांच्या विरोधात भारतीय दंड न्याय संहितेच्या कलम ११५(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. लवकरच या प्रकरणात आवश्यक कारवाई केली जाणार असून चाैकशीदरम्यान दोन्ही तृतीयपंथींनी पोलिसांसमोर माफी मागितल्याचे समजत आहे. प्रवाशांची सुरक्षा करण्याचे काम रेल्वे पोलिसांचे असून भविष्यात अशा घटना होऊ नयेत यासाठी संबंधितांवर योग्य कारावाई होण्याची आशा आहे.

CJP समर्थकांनी हाइड्रोजन ट्रेनवर केली दगडफेक? रेल्वेने सत्य केले उघड; Video Viral

घटनेचा व्हिडिओ @bombay नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर या घटनेचे दृष्य शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘सुरक्षित वाहन चालवा, जीव वाचवा’. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “हे थांबवले पाहिजे; लोकल गाड्यांमध्ये त्यांच्यामुळे होणारा उपद्रव सतत वाढत आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जर तुम्ही पैसे दिले नाहीत, तर ते ते करतील”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “जोपर्यंत एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या दिव्यांग नसेल, तोपर्यंत भारतात भिक्षा मागणे बेकायदेशीर आणि गुन्हा ठरवा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Mumbai local train viral video transgender assault passenger rpf action grp case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 22, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • train viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
1

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral
2

पाण्यासाठी पाकिस्तानी सैनिकांमध्येच जुंपली, जवानांनी एकमेकांना ओढत केली तुफान हाणामारी; Video Viral

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’
3

रिल पडली महागात! ३० फुटांवरून धरणात मारली उडी, दोन्ही पाय मोडले! रुग्णवाहिकेतून म्हणाला- ‘पुन्हा कधीही स्टंट करणार नाही’

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral
4

‘मित्र’ समजून भरवत होता चिकन, मगरीने जबड्यात पकडले दोन्ही पाय; १ तास चालला संघर्ष…घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.