
फोटो सौजन्य सोशल मिडिया
Ajay Devgn Old Video : अजय देवगण आपला मुलगा युगसोबत अजमेर शरीफ दर्ग्यात पोहोचला चाहत्यांच्या मोठ्या गर्दीने त्याला घेरले होते. हा व्हायरल झालेल्या एका जुन्या व्हिडिओ मध्ये अजय देवगन आपल्या मुलाचे रक्षण करताना दिसत आहे. तसेच गर्दीत झालेल्या धक्काबुक्कीवर संतापलेला पाहायला मिळत आहे.
बॉलिवूडचा ‘सिंघम’ अजय देवगणचा सध्या एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आहे. अजय देवगन आपला मुलगा युगसोबत राजस्थानच्या प्रसिद्ध अजमेर शरीफ दर्ग्यात गेला होता. मात्र, त्याला पाहण्यासाठी थांबलेल्या चाहत्यांनी मोठी गर्दी केली होती. अजय देवगन आणि मुलाला युगेन या दोघाचेही तिथून निघणे कठीण झाले होते. प्रत्येकजण अजयची एक झलक पाहण्यासाठी आणि आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ काढण्यासाठी आतुर झाला होता. यामध्ये परिस्थिती अधिकच बिघडत असल्याचे पाहून, अजयला गर्दीपासून आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी पुढे यावे लागले.
सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, अजय देवगण पारंपरिक पध्दतीने वस्त्र परिधान केलेले दिसत आहे. त्याच्या चाहत्यांच्या गर्दीने त्याला चारी साईडने घेरले, अनेकजण सतत आपल्या मोबाईल फोनने त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढत आहेत. अजय त्याच्या मुलासोबत युगसोबत चालताना दिसत असून गर्दीत त्याला सांभाळण्याचा प्रयत्न करताना आहे.
या व्हिडिओ मध्ये अजय देवगनचा संयम सुटल्याने परिस्थिती आणखी चिघळत गेली. व्हिडिओच्या दुसऱ्या भागात, गर्दीच्या वागण्यावर अभिनेता अजय देवगन अधिक संतापलेला वाटतोय. ही घटना 2019 मध्ये घडली होती. जेव्हा अजय आपल्या मुलासोबत अजमेर शरीफला गेला होता. आता हा व्हिडिओ अनेक वर्षांनंतर पुन्हा इंटरनेटवर व्हायरल होत आहे.
Ajay Devgn visited Ajmer Sharif with his son, some people start misbehaving with him and even get physical. In response, Ajay Devgn loses his temper, gets furious at them, and eventually gets involved in a physical altercation.
#VandeBharatSleeper Indian Railways Shraddha Kapoor https://t.co/ceLpwTeC9L — Ankita Agarwal Fearless voice for 🔥 #SocialChange (@_Ankita_Agarwal) October 30, 2026
अजमेर शरीफ दर्गा राजस्थानमधील अजमेर येथे आहे. हे सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचे दर्गा आहे आणि भारत तसेच परदेशातून मोठ्या संख्येने लोक येथे दर्शनासाठी येतात. अजय आणि त्याचा मुलगा युगसोबतही भेट दिली. मात्र, आता त्याच्या भेटीपेक्षा गर्दी आणि अजय देवगनच्या रागाचीच जास्त चर्चा होत आहे.
अजयकडे आता चित्रपटांची मोठी रांग आहे. त्याच्या आगामी चित्रपटांमध्ये “गोलमाल 5,” “रेंजर,” “सूर्यस्पर्श,” आणि “चौहान” यांचा समावेश आहे. “गोलमाल 5” हा 8 जानेवारी 2027 रोजी, तर “चौहान” 1 ऑक्टोबर 2027 रोजी प्रदर्शित होणार आहे. “रेंजर” आणि “सूर्यस्पर्श” हे चित्रपटही 2027 मध्ये प्रदर्शित होणार आहेत. येत्या काळात, अजय पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर अॅक्शन आणि कॉमेडीची धमाल आणण्यासाठी सज्ज होत आहे.