(फोटो सौजन्य: X)
काळ आला होत पण वेळ…! बाईक घसरली, चप्पल उडाली; रस्त्याच्या काठावरुन कोसळणार तितक्यात… Video Viral
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एका रेल्वे स्टेशनवर काही लोक दगडफेक करताना दिसतात. लोक रेल्वे ट्रॅकवर उभे असतात आणि समोरुन येणाऱ्या निळ्या रंगाच्या रेल्वेवर त्यांची दगडफेक सुरु असते. व्हिडिओमध्ये दगडफेक स्पष्ट दिसून येते परंतु घटना नक्की कोणत्या रेल्वे स्थानकावर घडून आली आहे याची माहिती मिळत नाही. यामुळेचे व्हिडिओचे ठिकाण आणि अधिकृत वेळ याची पुष्टी करता येत नाही.
व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी व्हिडिओला शेअर करत भारताच्या पहिल्या स्वदेशी हाइड्रोजन रेल्वेवर हल्ला झाल्याचा दावा केला. काही पोस्टमध्ये असाही दावा करण्यात आला की, जंतर-मंतरवरील काही कॉकरोच जनता पार्टीच्या (सीजेपी) प्रदर्शनकर्त्यांनी हा हल्ला केला. या दाव्याच्या आधारे अनेक वापरकर्त्यांनी CJP आणि त्यांच्या नेत्यांना लक्ष्य करणाऱ्या कमेंट्सही केल्या.
रेल्वेने दावा फेटाळला
अशातच व्हायरल व्हिडिओ हा वेगळा असून यातील दावा देखील खोटा आहे असे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यांनी सांगितले की, व्हिडिओत दिसणारी ट्रेन ही हाइड्रोजन ट्रेन नसून WAG-12 लोकोमोटिव्हवर चालणारी ट्रेन आहे. हा व्हिडिओ जुना असण्याची शक्यता असून हाइड्रोजन ट्रेन आपल्या वेळापत्रकानुसार सुरळीत सुरु आहे असेही त्यांनी सांगितले.
Is Arvind Kejriwal’s father’s money invested in this Hydrogen train? Or Deepak’s father’s? No Neither the politicians nor the stone pelters paid for it It is funded by the common man’s hard earned taxes Stop throwing stones at your own property Vandalism brings up to life… — Ramesh Tiwari (@rameshofficial0) July 20, 2026
थरार नडला! झिपलाईन तुटताच तरुण थेट धड्डाम जमिनीवर कोसळला; घटनेचा लाईव्ह Video Viral
दरम्यान सदर घटनेचा व्हिडिओ @rameshofficial0 नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला चांगले व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “कोलकाता किंवा बिहारमधील तो कम्युनिस्ट लफंगा, जो त्या जुन्या लाकडी खुर्चीत बसून दहशतवादी उपद्रवींचे समर्थन करणारे ट्विट्स करत आहे, त्याला त्याच्या सरकारी नोकरीवरून बडतर्फ करून फाशीच्या शिक्षेची वाट पाहण्यासाठी तुरुंगात डांबले पाहिजे. भारतीय रेल्वेची ही लज्जास्पद बाब आहे; तुम्ही दहशतवाद्यांचे रक्षण करण्यासाठी भारतीयांची लूट करत आहात”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या घटनेवरून अनियंत्रित जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी योग्य सुरक्षा कार्यपद्धतींचा अभाव असल्याचे आणि यापूर्वी घडलेल्या चेंगराचेंगरी व इतर घटनांमधून कोणताही धडा न घेतल्याचे स्पष्ट होते.”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “व्हिडिओमध्ये दिसणारे इंजिन हे हायड्रोजन ट्रेनचे नसून, WAG-12 इलेक्ट्रिक मालवाहू लोकोमोटिव्हचे आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






