
"सीटवर पाय का ठेवला..." रेल्वेच्या बाचाबाचीत तरुणाने व्यक्तीच्या थेट कानशिलात लगावली, पाहून इतर प्रवासीही थबकले; Video Viral
काय घडलं व्हिडिओत?
इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला एक तरुण सीटवर बसलेला तर त्याच्यासमोर दुसरा तरुण त्याच्यावर डाफरात असल्याचे दिसून येते. व्यक्तीच्या बोलण्यातून असे समजते की, त्याने तरुणाला सीटवर पाय ठेवू नको असे सांगितले होते पण जेव्हा व्यक्ती त्याचे बोलणे ऐकत नाही तेव्हा त्यांच्यात वाद सुरु होतो. या वादातच तरुणाला राग अनावर होतो आणि व्यक्तीच्या सनकन कानशिलात लागवतो. त्याची ही थप्पड इतकी जबरदस्त आणि जोरदार असते की पाहून इतर प्रवासीही काही अंशी घाबरल्याचे दिसून येते. भांडणात गांभीर्य बघता कुणीही यात मध्यस्ती करत नाही. व्हिडिओ दुरूनच एक प्रवाशाने आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केल्याचे समजते. दरम्यान सोशल मीडियावर मात्र या व्हिडिओवरून आता युजर्समध्ये नवं युद्ध सुरु झालं आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेकांनी आपापल्या जाती, धर्म आणि प्रांतावरून दोन्ही पक्षांची बाजू घेऊ पाहिली. काहींनी मराठी बाणा म्हणत व्यक्तीच्या कृतीचे कौतुक केले तर काहींनी दुसऱ्या प्रांतातील लोकांनी जर मराठी लोकांसोबत असे केले तर काय होईल असा प्रश्न उपस्थित केला.
या घटनेचा @domumbai_ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आला कानाखाली मराठी आवाज आला. जय महाराष्ट्र” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “सीटवर पाय ठेवण्याचा अर्थ असा नाही की त्याला मारायला हवं, शिवी द्यायला हवी, ही तर गुंडगिरी आहे, मुंबई सुरक्षित नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “दुसऱ्या राज्यातही जर मराठी लोकांसोबत असं काही घडलं तर तुम्ही काहीच करू शकणार नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.