(फोटो सौजन्य – X)
कॅमेराने टिपलेल्या या दृश्यात दगड व्यवस्थित जुळलेले दिसले. त्याच्यांवर प्रकाश पडताच ते पिवळ्या रंगात चमकतात. याकडे पाहताच ते मानवनिर्मित रस्त्यासारखे दिसते. शास्त्रज्ञांनी याला “यलो ब्रिक रोड” किंवा “द रोड टू अटलांटिस” असे संबोधले आहे. हा शोध युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ आणि जगातील सर्वात मोठ्या सागरी संवर्धन क्षेत्रांपैकी एक असलेल्या पापाहनामोकुआकेआ मरीन नॅशनल मोन्युमेंटमध्ये झाला. शास्त्रज्ञ तेथील समुद्रतळावरील पर्वत आणि ज्वालामुखी रचनांचा अभ्यास करत होते.
🚨#BREAKING THE GOLDEN AGE 🥇
Scientists Discovered a ‘YELLOW BRICK ROAD’ at The Bottom of The Pacific Ocean! THE ROAD TO OZ An expedition to a deep-sea ridge, just north of the Hawaiian Islands, revealed a surprise discovery back in 2022: an ancient dried-out lake bed paved… pic.twitter.com/jZz3qDzIyH — SANTINO (@MichaelSCollura) April 28, 2025
शास्त्रज्ञांनी जेव्हा रस्त्यासारख्या दिसणाऱ्या त्या रचनेचे प्रशिक्षण केले तेव्हा त्यांना समजले की, ही कोणतीही मानवनिर्मित रचना नसून नैसर्गिक भूगर्भीय प्रक्रियेचे परिणाम आहे. लाखो वर्षांपूर्वी समुद्राखाली ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता ज्यानंतर वितळलेला लावा थंड समुद्राच्या पाण्यात जाताच तो वेगाने थंड होऊ लागतो ज्यामुळे समुद्राखाली भेगा पडतात. या प्रक्रियेत सरळ रेषेत काटकोनात भेगा पडतात ज्यामुळे त्या फारशीसारख्या दिसू लागतात. या प्रकारच्या रचनेला भूगर्भशास्त्रात हायलोक्लास्टाइट म्हणतात. एका अभ्यासानुसार, मानवाने आतापर्यंत महासागराचा फक्त काही अंशी भागच पाहिला आहे. गेल्या ६७ वर्षांत, खोल महासागराचे फक्त ०.००१ टक्के फोटो काढण्यात आले आहेत ज्यावरून हे समजते की अजून समुद्राचा बराच भाग असा आहे जो मानवापासून लपलेला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






