NASA astronaut captures breathtaking view of 'Aurora Borealis', video viral
रात्रीच्या आकाशातील सर्वात आश्चरकारक दृश्यांपैकी एक म्हणजे ऑरोरा बोरेलिस, ज्याला नॉर्दर्न लाइट्स म्हणून ओखळले जाते. हे विस्मयकारक दृश्य पाहण्यासाठी अनेक लोक वर्षानुवर्षे वाट पाहतात. काही जणांना पूर्ण आयुष्यात एकदाच हे सौंदर्य पाहायला. या तेस्वी, हिरव्या प्रकाशाच्या हालचाली दर्शवणे व्हिडिओ आणि छायाचित्रे लोकांना मंत्रमुग्ध करुन टाकतात. अलीकडेच नासाचे अंतराळवीर जॉनी किम यांनी याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
किम यांनी या ऑरोरा बोरेलिसचा पहिल्यांदाच अनुभव घेतला. या अद्भुत दृश्याला त्यांनी टाईम-लॅप्सच्या मदतीने कॅमेरात कैद केले आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या आकर्षक दृश्यामध्ये आग्नेय आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या अवकाशात नाचणारे ऑरोरा लाईट्सचे दृश्य दिसत आहे.स्पेसएक्सच्या ड्रॅदन यानातून प्रवास करताना त्यांनी अंतराळातून पाहिलेल्या ऑरोराचा दृश्य टिपले.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, “हा माझा पहिला टाइम-लॅम्सचा अनुभव होता. हे दृश्य मला मासेमारीसाखे वाटले.त्यांनी सांगतिले की, निकोल आयर्सयांच्या मार्गदर्शनामुळे आणि त्यांनी दिलेल्या टिप्समुळे मला हे दृश्य कैद करता आले, यामुळे त्यांना मी धन्यावाद म्हमतो. या दृश्याने ते मंत्रमुग्ध झाल्याचे किम यांनी सांगतिले.’
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
My first time-lapse. Thanks to some instruction and tips from @Astro_Ayers, I caught my first aurora. After seeing the result, I told her this felt like fishing. Prepping the camera, the angle, the settings, the mount, then setting your timer and coming back to hope you got a… pic.twitter.com/RgEaq50E5p
— Jonny Kim (@JonnyKimUSA) June 6, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर जॉनी किम यांनी आपल्या @JonnyKimUSA अकाऊंटवर शेअर केला आहे. तसेच नासाचे आणखी एक अंतराळवीर अॅन मॅकलेन यांनी देखील याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओला शेकडो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजने “हे दृश्य खरंच मनमोहक आहे असे म्हटले आहे”, तर दुसऱ्या एका युजरने “हे अद्भुत आहे, हे सौंदर्य शेअर केल्याबद्दल धन्यवाद!” असे म्हटले आहे. आणखी एकाने म्हटले आहे की, अफलातून दृश्य आहे, अगदी श्वास रोखून टाकणारं आहे,” अशा विविध प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.