वाढदिवसाच्या सेलिब्रेशन दरम्यान तरुणासोबत घडलं भयंकर; फायर कॅंडलने पेट घेतला अन्...; भयावह VIDEO व्हायरल (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ. डान्स, स्टंट, जुगाड, भांडण, वेगवेळ्या सेलिब्रेशनचे व्हिडिओ सतत व्हायरल होत असतात. वाढदिवाच्या सेलिब्रेशनचेही अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील. हा दिवस खास बनवण्यासाठी लोक वेगवेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करतात. यासाठी भन्नाट डेकोरेशन, मोठा केक, फटाके, फायर कॅंडल्स अशा विविध गोष्टींचा वापर केलेला असतो. सध्या असाच एका तरुणाचा वाढिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण या तरुणासोबत सेलिब्रेशन वेळी भयंकर घटना घडली आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका तुरुणाचे बर्थ डे सेलिब्रेशन सुरु आहे. कुटुंबातील सर्व सदस्यांनी आई, वडिल, भाऊ सेलेब्रेशनचे प्लॅन केला आहे. केकवरील कॅंडलवरुन तरुणाचा १७ वा वाढदिवस असल्याचे लक्षात येते. तसेच ओवळणीचे ताट देखील दिसत आहे. तरुणाचा भाऊ १७ नंबरची कॅंडल पेटवतो. पण त्यानंतर तरुणासोबत भयंकरच घटना घडते. तरुण त्याच्या हातात फायर कॅंडल घेऊन ती पेटवतो आणि फिरवत असतो.
याच वेळी त्याचा भाऊ फोमचा स्प्रे मारतो, तो स्प्रे तरुणाच्या डोक्यावर तोंडावर पडलेला असतो. तर तरुण हातात फायर कॅंडल घेऊन फिरवत असतो. अचानक चेहऱ्यावरील फोममुळे तरुणाचा चेहरा फायर कॅंडमुळे जळतो. स्प्रे आणि फायर कॅंडलच्या संपर्कामुळे मोठा आगीचा भडक उडतो. तरुणाचा चेहरा आणि केसाला आग लागते. जवळ असलेल्या महिला आग विझवण्याचा प्रयत्न करतात. सुदैवाने तरुणाला गंभीर दुखापत होत नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @muna__one या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा भयंकर व्हिडिओ पाहून अनेकांनी विवध प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तरुणाची खिल्ली उडवली आहे, तर काहींनी असे स्टंट भयंकर आहेत असे म्हटले आहे. यामुळे गंभीर दुखापतही होऊ शकते. यामुळे कोणत्याही प्रकारचे सेलिब्रेशन करताना अशा प्रकारच्या गोष्टींपासून सावध राहिले पाहिजे. सध्या हा व्हिडिओ मोठ्या प्राणामात व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यसाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.