Nigerian students dance on the song 'Deva Shri Ganesha video viral
उद्या २७ ऑगस्ट रोजी गणपतीचे बप्पाचे आगमन होणार आहे. यासाठी भारतात सर्वांची जल्लोषात तयारी सुरु आहे. सर्वांनी बप्पासाठी मस्त डोकेरेशन आणि मोदक बनवले असतील. सर्वजन बप्पा येण्याच्या आनंदात असतील. हा सण केवळ भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. दरम्यान या सणानिमित्त देशभरात जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. पण गणेशोत्सव केवळ भारतातच नाहीत तर परदेशातही साजरा केला जातो. परदेशी लोकांमध्येही गणपती बप्पाची क्रेझ पाहायला मिळते. याचे अनेक व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील.
आता हेच पाहा ना आफ्रिकन देशातील नाजेरियातील मुलांनी गणेशाच्या गाण्यावर काय भन्नाट डान्स केला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. बॉलीवुडमधील अग्निपथ चित्रपटातील देवा श्री गणेशा गाण्यावर या मुलांनी डान्स केला आहे. नायजेरियाच्या ड्रीम कॅचियर्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी यावर डान्स केला आहे. हा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @dreamcatchersda या अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. या व्हिडिओला भारतीय नेटकऱ्यांची मोठी पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लोकांकडून मुलांचे प्रचंड कौतुक होत आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओवर भारतीयांकडून पसंती मिळत आहे. विद्यार्थ्यांना भारतात पाठवा असे म्हटले आहे. अनेकांनी परदेशी लोकांना भारतीय संस्कृतीचा आदर पाहून आम्हाला अभिमान वाटला असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका तुमचे भारतात नेहमी स्वागत आहे असे म्हटले आहे. आणकी एकाने भारतीय संस्कृती आहेच खास असे म्हटले आहे. अनेकांनी मुलांच्या डान्सचे कौतुक केले आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.