(फोटो सौजन्य: Instagram)
सोशल मीडियावर नेहमीच अनेक मजेदार आणि दुर्लभ व्हिडिओ व्हायरल होत असतात जे आपल्या मनोरंजनाचे काम करतात. हे व्हिडिओज कधी आपल्याला हसवतात, कधी थक्क करतात तर कधी आश्चर्याचा धक्का देऊन जातात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आणलं आहे. व्हिडिओमध्ये एक बकरी आणि बैल यांच्यामध्ये एक मजेदार युद्ध रंगल्याचे दिसते. पण आश्चर्याने यात बैल नाही बकरी विजयी ठरते. चिमुकली बकरी बैलावर हल्ला करत त्याला अशी अद्दल घडवते की बैल घाबरून थेट उलटे पाय घेऊनच पळू लागतो. हे दृश्य आता इंटरनेटवर चांगलंच व्हायरल होत असून बकरीने बैलावर मिळवलेला हा विजय आता सर्वांनाच थक्क करत आहे.
काय घडलं व्हिडिओत?
हिमतीने आपण कोणत्याही गोष्टीवर विजय मिळवू शकतो ही गोष्ट व्हिडिओत सत्यात घडताना दिसून आली आहे. व्हायरल व्हिडिओ हा एका खुल्या मैदानातील दिसून येत आहे जिथे एक बकरी आणि बैल आमने-सामने लढाईसाठी उभे आहेत. दोघंही एकमेकांवर हल्ला करण्यासाठी सज्ज होतात आणि तितक्यातच बकरी बैलाला एक जोरदार धडक मारते. ही धडक इतकी जबरदस्त असते की बैल या धडकेने हादरून जातो पण आश्चर्याने बकरी मात्र पुन्हा एकदा त्याच्यावर हल्ला करण्यासाठी तयार असते. बकरी बैलाजवळ जाईल तितक्यातच बैल बकरीला घाबरून पळत सुटतो आणि आपला चिमुकल्या प्राण्यापासून आपला जीव वाचवू लागतो. हे दृश्य आता सोशल मीडियावर शेअर करण्यात आले असून युजर्स आता बकरीच्या धैर्याचे भरभरून कौतुक करत आहेत.
बैल आणि बकरीमधील मजेदार लढतीचा हा व्हिडिओ @jhunjhunu_ko_fouji नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “शरीर पाहून कोणतेही अनुमान लावू नका” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बकरीची सुपरपॉवर” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “संपूर्ण बैल समाज घाबरलेला आहे”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.