Old lady driving bike in full speed on highway video goes viral
सोशल मीडियावर रोज भन्नाट व्हिडिओ धुमाकूळ घालत असतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे वेगवेळे कंटेट आपल्याला पाहायला मिळतात. सध्या असाच एका आजींचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहे. यामध्ये एक आजी जुनी बाईक वाऱ्याच्या वेगाने पळवताना दिसत आहे. त्यांच्या आसपासहून अनेक लोक जाताना त्यांना पाहून हैराण होत आहे. आजी गाणी म्हणत आपल्या धुंदीत बाईक चालवत आहेत. पांढरे केस, चेहऱ्यावर सुरकुत्या पण स्टाईल अशी की कोणालाही लाजवेल.
व्हिडिओवरुन आजींचे वय ७० ते ८० च्या आसपास असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. विशेष म्हणजे आजी साडी घालून मस्त स्वॅगमध्ये बाईक चालवताना दिसत आहेत. बाईकचा हॅंडलने एका हाताने पकडत, गाणी म्हणत हातावारे करत आजी मस्त फिरत आहेत. त्यांचा आत्मविश्वास पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. सध्या हा व्हिडिओ नेमका कुठला आहे कळाले नाही, पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.
💀Dadi Mogging pic.twitter.com/842QzjkoPf
— rareindianclips (@rareindianclips) August 22, 2025
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @rareindianclips या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. कोणी आजींना रॉकस्टार म्हणत आहे, तर कोणी आजींचा स्वॅग भारीय असे म्हणत आहे. एका युजरने आजी तरुणपणात नक्कीच रायडर असतील असे म्हटले आहे.
आणखी एकाने आजी-आजोबांना कुठे सोडले असा प्रश्न केला आहे. तसेच हौसेला वय नसते हे आजींनी दाखवून दिले असे म्हटले आहे. यांसारखे अनेक व्हिडिओ तुम्ही यापूर्वीही पाहिले असतील. कधी आजोबांचे स्वॅगमध्ये गाडी चालवतानाचे, तर कधी आजीला बाईकवर घेऊन जातानाचे असे व्हिडिओ पाहायला मिळतात.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.