दुचाकीस्वार, मागे दोन बायका अन् डझनभर मुलं... रस्त्यावर धावणाऱ्या अनोख्या बाईकने वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral
सोशल मीडियाच्या जगात नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. इथे बरेच असे व्हिडिओज व्हायरल होतात जे आपल्या कल्पनेपलीकडचे ठरतात. सोशल मीडियावर जुगाड, अपघात आणि निरनिराळ्या स्टंट्सचे बरेच व्हिडिओ शेअर केले जातात जे युजर्सचे लक्ष वेधून घेतात आणि आताही असाच एक लक्षवेधी व्हिडिओ इथे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक दुचाकीस्वार आपल्या बाईकवर एक नाही दोन नाही तर डझनभर लोक घेऊन रस्त्यावर दुचाकी चालवताना दिसून आला. त्याचा हा पराक्रम पाहून रस्त्यावर सर्वच हक्काबक्का झाले आणि वेगाने हा व्हिडिओ शेअर करू लागले.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक व्यक्ती रिक्षात बसून रस्त्यावरचे काही थक्क करणारे दृश्य आपल्या कॅमेरात कैद करत असल्याचे दिसून येत आहे आणि पुढच्याच क्षणी त्याच्या बाजूने एक अनोखी बाईक जाताना आपल्याला दिसून येते. ही बाईक अनोखी यासाठी असते कारण यावेळी त्या बाईकवर दोन किंवा तीन व्यक्ती नाही डझनभराहुन अधिक लोक विराजमान झालेली असतात. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो यात दुचाकीस्वार, त्याच्या मागे दोन बायका आणि त्यांच्या मागे क छोटी कार बांधलेली दिसते ज्यात किमान अर्धा डझनभर इतकी मुले बसलेली असतात. व्यक्तीच्या या देसी जुगाडाने आता सर्वांचेच लक्ष वेधून घेतले असून काही लोक या जुगाडाचे कौतुक करत आहेत तर काही सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त करताना दिसून येत आहेत. हा व्हिडिओ नक्की कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी भारतात जुगाडू लोकांची काही कमतरता नाही हे या व्हिडिओतून पुन्हा दिसून आले.
बहुत हैवी ड्राइवर है😅😂🤣😝🤩👻💦🌚🌚🏍️🏍️ pic.twitter.com/upICbgcigK
— ट्यूबलाइटSB💡🏮 (@musphira166492) June 21, 2025
बाईकचा हा व्हायरल व्हिडिओ @usphira166492 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “भारत नवशिक्यांसाठी नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भावाने तर कमालच केली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “भावाला २१ तोफ्यांची सलामी द्यायला हवी”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.