1 वर्षाचा मुलगा बनला विषारी प्राण्यासाठी काळ; चिमुकला वाचला पण किंग कोब्राचा झाला मृत्यू; अजब गजब घटनेचा Video Viral
सोशल मीडियावर सध्या एक अजब-गजब घटना वेगाने व्हायरल होत आहे ज्यात एका चिमुकल्या मुलाने किंग कोब्राला चावण्याची घटना घडून आली आहे. मुख्य म्हणजे, हा मुलगा केवळ १ वर्षांचा असून यात किंग कोब्राचा जागीच मृत्यू झाला आहे. जंगलातील धोकादायक प्राण्यांमध्ये किंग कोब्रा मुख्यत्वे समाविष्ट होतो. अशात ज्याने ज्याने भल्याभल्यांना मृत्यूच्या दारी पाठवले अशा कोब्राचा जीव घेणे म्हणजे काही साधी गोष्ट नाही. कोब्राचे विष इतके घातक असते की त्याच्या एका डंकाने व्यक्तीचा जागीच मृत्यू होऊ शकतो. अशात चिमुकल्याने कोब्राचा केलेला घात आता सर्वांना आश्चर्यचकित करत आहे. चला सविस्तर जाणून घेऊया.
काय आहे प्रकरण?
ही धक्कादायक घटना बेतियाहून समोर आली आहे. खेळताना एका निष्पाप मुलाने विषारी नागाचा चावा घेतला. मुलाने दातांनी सापाचा जोरदार चावा घेतला, ज्यांनंतर सापाचा जागीच मृत्यू झाला. मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे आणि तो धोक्याबाहेर आहे. ही घटना पश्चिम चंपारण जिल्ह्यातील मजौलिया ब्लॉकमधील मोहझी बनकटवा गावात घडून आली आहे. या घटनेनंतर कुटुंबातील सदस्यांनाही धक्का बसला आहे. माहितीनुसार, या चिमुकल्याचे नाव गोविंद कुमार असे आहे. खेळता खेळता त्याने सापाला आपल्या हाताने पकडले आणि त्याचा चावा घेतला. त्यानंतर तो मुलगा बेशुद्ध पडला.
बिहार : बेतिया में 1 साल के बच्चे ने कोबरा को काटा, कोबरा की हुई मौत ◆ सांप को काटने के कुछ घंटे बाद बच्चा भी बेहोश हो गया ◆ डॉक्टर ने बताया कि बच्चे के शरीर में जहर का कोई भी लक्षण नहीं है और वह खतरे से बाहर है #Bihar | #CobraSnake | Bihar | Cobra Snake pic.twitter.com/hHM17QFC2V — News24 (@news24tvchannel) July 26, 2025
कुटुंबाने गोविंदाला स्थानिक पीएचसीमध्ये दाखल केले. परिस्थितीचे गांभीर्य पाहून डॉक्टरांनी त्याला बेतिया सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (जीएमसीएच) रेफर केले. तेथील डॉक्टर डॉ. सौरभ कुमार यांनी सांगितले की, सध्या मुलाची प्रकृती स्थिर आहे आणि डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. डॉक्टर मुलावर उपचार करत आहेत. त्याला इंजेक्शनसह सतत औषधे दिली जात आहेत. दुसरीकडे, कुटुंबाचे म्हणणे आहे की साप मुलाला चावल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे गोविंदाचा जीव वाचला. डॉक्टरांच्या मते, ही घटना खूपच अनोखी आहे. मुलाच्या चाव्यामुळे सापाच्या तोंडात आणि डोक्यात जखम झाली असावी, ज्यामुळे सापाचा मृत्यू झाला असावा. विषाचा परिणाम मुलावर सौम्य होता, ज्यामुळे तो बेशुद्ध झाला. वेळेवर उपचार मिळाल्यामुळे तो धोक्याबाहेर आहे. दरम्यान ही घटना आता सोशल मीडियावर मात्र जोरदार धुमाकूळ घालत आहे आणि सर्वांना आश्चर्यचकित देखील करत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.