(फोटो सौजन्य: Instagram)
जंगलात शिकारीच्या अनेक घटना घडत असतात. जंगलाचा नियमच आहे, इथे एकाला जगण्यासाठी दुसऱ्याचा बळी जाणे हे कटू सत्य आहे. जंगलातील सर्वात धोकादायक प्राण्यांविषयी बोलणं केलं तर त्यात सिंह, वाघ, मगर आणि सापाचा समावेश येतो. आपल्या ताकदीचा वापर करून हे शिकारी जंगलातील अनेक प्राण्यांची दररोज शिकार करतात. अशातच सापाच्या आणखीन एका थरारक शिकारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पण शिकारीच्या या दृश्यात एक असा ट्विस्ट येतो की शिकारीचे संपूर्ण दृश्यच बदलून जाते. वास्तविक, व्हिडिओत सापाने एक मादी पक्षी आणि तिच्या अंड्यांवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केलेला असतो पण तितक्यात तिथे इतर पक्षी त्यांच्या रक्षणासाठी येतात आणि आपल्या एकजुटीने ते सापाला चांगलाच धडा शिकवतात. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात एक साप झाडावर चढून अंड्यांना खाण्याच्या उद्देशाने घरट्यावर हल्ला करू पाहतो पण मादी पक्षी त्याला असं करण्यापासून रोखते, ज्यांनंतर साप तिच्यावर हल्ला चढवतो आणि तिच्या शरीराभोवती विळखा घालत तिची शिकार करू पाहतो. आपल्या मुलांना वाचवण्यासाठी आई ढाल बनून पुढे आली खरी परंतु आता यात तिचेच प्राण हिरावून घेतले जाणार अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र खरा ट्विस्ट ते तेव्हा येतो जेव्हा तिथे अचानक अन्य पक्ष्यांचा थवा वेगाने उडत येतो. सर्व पक्षी घरट्याभोवती उडत राहतात जे पाहताच साप जरा घाबरतो. यांनतर ते पक्षी आपल्या चोचीने सापाला पकडत त्याला हवेतून जोरात खाली फेकून टाकतात आणि आई-अंड्यांना काही झालं तर नाही हे पाहण्यासाठी पुन्हा घरट्याजवळ जातात. आपण एकीने सर्व कठीण प्रसंगावर कशी मात करू शकतो हे यातून दिसून येते. शेवटपर्यंत सापचं विजयी ठरतोय की काय असे वाटणारे क्षण लगेचच बदलते आणि अखेर यात एकीचा विजय होतो.
हा व्हायरल व्हिडिओ @manturaj2031 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा व्हिडिओ एआय क्रिएटेड वाटत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे व्वा, सापाची चांगली जिरवली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मजा आली”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.