Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Photo: ‘दार उघड…’ पैठणीची हाफचड्डी झाली व्हायरल, ‘बांदेकर भाऊजीं’च्या फोटोसह मीम्सचा पाऊस

अरे देवा आता हेच पहायचं राहिलं होतं! असाच काहीसा सध्या नेटिझन्सचा राग दिसतोय. त्याचं कारणही तसंच आहे. पैठणी शॉर्ट्सचा फोटो इतका व्हायरल झालाय की, त्याचे मीम्स तयार होत आहेत. पहा मजेशीर फोटो

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 18, 2026 | 01:17 PM
अरे देवा हेच पहायचं राहिलं होतं (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

अरे देवा हेच पहायचं राहिलं होतं (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पैठणी शॉर्ट्स झाली व्हायरल
  • मीम्सचा पाऊस, बांदेकर भाऊजींनाही फटका 
  • पैठणी शॉर्ट्स पाहून नेटकरी हैराण 
कधी काय व्हायरल होईल हे काही सांगता येत नाही. सध्या एक जाहिरात बाजारात धुमाकूळ घालत आहे. खरं तर ‘पैठणी’ ही महाराष्ट्राची शान आहे. आजपर्यंत पैठणी साड्या, पैठणी कुरते अगदी महिला आणि पुरुषांसाठी आपण पाहिले आहेत. पण आता बाजारात आलेल्या पैठणी शॉर्ट्स आणि अगदी मराठीत सांगायचं झालं तर पैठणीच्या चड्डीने बाजारात धुमाकूळ घातला आहे पण चांगल्या पद्धतीने नाही. ही हाफचड्डी चांगलीच व्हायरल झाली आहे. पारंपरिक वस्त्राचे हे आधुनिकीकरण अनेकांना पटलेले नाही. या डिझाईनवर चांगलीच झोड आता उठवली जाते आहे आणि इतकंच नाही तर यावर आता मीम्सही तयार झाले आहेत आणि पैठणीच्या खेळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आदेश बांदेकरांनाही आता यामध्ये ओढलं गेलंय. 

मुर्खपणाचा कळस! धावत्या ट्रेनसमोर रुळावरच उभा राहिला तरुण; पुढं जे घडलं पाहून अंगावर काटा येईल, Video Viral

नेटकऱ्यांचा संताप

अनेकांनी हे पोस्टर अत्यंत किळसवाणे असून संस्कृतीचा अपमान केला असल्याचं म्हटलं आहे. प्रसाद देशपांडे या युजरने हे पोस्टर आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट केलं आणि त्याखाली त्यांनी लिहिलं की, ‘खण आणि नारळ आणला नाही नशीब, नाहीतर गुलाल बुक्क्याचा कार्यक्रमात ओटी भरण्याचा कार्यक्रम उरकावा लागला असता! त्यातही थोर नशीब म्हणजे किमान मोर योग्य ठिकाणी ठेवलाय! पैठणीची पत तर घालवलीच, पण नाच रे मोरा आंब्याच्या वनात ह्या उत्तम गाण्याची पत ही घालवलीत ह्यांनी!’ इतकंच बोलून ते थांबले नाहीत तर ‘मार्केटमध्ये आता नवीन उखाणा येणार’ असा पद्धतशीर टोमणाही दिला आहे आणि अगदी हॅशटॅगसह हा उखाणाही त्यात लिहिला आहे. ‘#मोरावर_मोर_चड्डीवर_मोर_अबक_रावांचं_नाव_घेते_सर्वांच्या_आग्रहा_खातर_वन्स_मोर’ 

मीम व्हायरल

आता खरी मजा तर यात आहे. नेटकऱ्यांना हा प्रकार आवडला नाहीच पण आता यामध्ये महाराष्ट्राची शान पैठणीच्या खेळासाठी प्रसिद्ध असणाऱ्या आदेश बांदेकरांनाही खेचण्यात आलं आहे. खरं तर पैठणीचा खेळ गेले अनेक वर्ष महाराष्ट्रात रंगला आणि आदेश बांदेकर यांनी तो खेळ प्रचंड प्रमाणात प्रसिद्ध केला. त्यामुळे आता ‘दार उघड भावा दार उघड’ अशीच वेळ बांदेकरांवर येणार की काय? अशा स्वरूपाचा प्रश्नच या मीममधून आल्याचे दिसून येत आहे. मुळात पैठणी ही पारंपरिक आहे त्यामुळे ती अशी हाफचड्डी स्वरुपात करण्याची गरजच काय असा अनेक नेटकऱ्यांचा प्रश्न आहे. आता व्हायरल झालेल्या या हाफचड्डीचे नेमके काय होणार हे पहावं लागेल.

VIDEO VIRAL : अमेरिकेत दोन अब्ज डॉलर्सची लढाऊ विमाने हवेतच एकमेकांना भिडली! हजारो प्रेक्षकांसमोर काळजाचा ठोका चुकवणारी दुर्घटना

एकंदरीतच कठीण…

आता ही जाहिरात पाहिल्यानंतर नक्की ही पैठणी हाफचड्डी कुठे मिळणार आणि किती रुपयांना असणार याबाबत काहीही दिलेले नाही. पण ‘Rooted In Tradition. Made For Today’ असं अगदी आत्मविश्वासाने त्यावर छापण्यात आले आहे. हेदेखील अनेकांना पटलेलं नाही. आता इतक्या ट्रोलिंगनंतर खरंच ही पैठणी हाफचड्डी बाजारात येणार का हादेखील प्रश्न आहे. 

Web Title: Paithani shorts viral photo new trend in market netizens shocked and got angry memes dragged adesh bandekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • lifestyle news in marathi
  • viral photo

संबंधित बातम्या

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!
1

पैठणी साडी आणि ‘मोर’ यांचे अतूट नाते काय? जाणून घ्या पैठणीचा राजेशाही इतिहास आणि पदरावरील नक्षीमागील रहस्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.