(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
पाकिस्तानमधील एका अनोख्या स्पर्धेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओतील दृश्यांमध्ये तुम्हाला पाकिस्तानच्या तरुणांचं केळी खाण्याचं अजब-गजब टॅलेंट दिसून येईल जे काहींना थक्क करू शकते तर काहींना हसू अनावर करू शकते. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती हातात टायमर पकडून आजूबाजूच्या लोकांना लवकरात लवकर केळी खाऊन दाखवण्याचे आव्हान देताना दिसून येतो. हे आव्हान अनेक तरुण स्वीकारतात आणि अवघ्या काही सेकंदातच केळी फास्त करून दाखवतात. एक व्यक्ती तर दोन सेकंदाचाही अवधी न घेता काही क्षणातच केळी गिळून दाखवतो जे पाहून सर्वच थक्क होतात. हा व्हिडिओ पाकिस्तानचा असल्याचे सांगण्यात येत आहे जो इंटरनेटवर वेगाने व्हायरल होत आहे.
माकडाने केले सिंहीणीचे हाल बेहाल…झाडावर चढताच जंगलाच्या राणीला तव्याने हाणलं अन्… Video Viral
हा व्हायरल व्हिडिओ @confess.superior नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “पाकिस्तान नवशिक्यांसाठी नाहीये” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे खायला सांगितलं होत, गिळायला नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ते जिंकत आहेत पण कोणत्या किंमतीवर”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






