'...मी डोनाल्ड ट्र्म्प यांची मुलगी'; पाकिस्तानमधील मुलीच्या दाव्याने उडाली एकच खळबळ, व्हिडिओ व्हायरल
इस्लामाबाद: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी डोनाल्ड ट्रम्प यांचे पुनरागमन झाले आहे. त्यांच्या आगमनानंतर अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. अमेरिकेत देखील त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. दरम्यान एक खळबजनक पण रोचक असा दावा पाकिस्तानमधून समोर आला आहे.डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर पाकिस्तानच्या एका मुलीने दावा केला आहे की ती डोनाल्ड ट्रम्प यांची सख्खी मुलगी आहे. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
ट्रम्प माझे वडील आहेत- पाकिस्तानमधील मुलीचा दावा
या मुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून व्हिडिओमध्ये ती मुलगी स्वतःला डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी म्हणून दावा करताना दिसत आहे. तिने ठामपणे म्हटले आहे की, “ट्रम्प माझे वडील आहेत, हे सत्य आहे आणि त्याबाबत कुणालाही शंका असू नये.” पाकिस्तानी माध्यमांशी संवाद साधताना या मुलीने हे विधान केले. व्हिडिओमध्ये तिने म्हटले आहे की, “मी डोनाल्ड ट्रंप यांची मुलगी आहे आणि मी मुस्लिम आहे.
हे देखील वाचा- ट्रम्प जिंकताच चीनचा सूर बदलला; तणावपूर्ण परिस्थिती असूनही दिल्या शुभेच्छा
ती पुढे म्हणते की, इंग्रज लोक जेव्हा मला पाहतात तेव्हा त्यांना आश्चर्य वाटतं की मी येथे काय करत आहे.” मुलीने असेही सांगितले की, ट्रम्प नेहमी तिच्या आईला तिला व्यवस्थित सांभाळ असे सांगायचे. व्हिडिओमध्ये ती मुलगी सतत डोनाल्ड ट्रम्प तीचे वडील असल्याचे म्हणत आहे. मात्र या व्हिडिओची सत्यता, मुलीच्या वक्तव्यांचा उद्देश, तसेच तिच्या मानसिक स्थितीबाबत काहीही ठोस माहिती अद्याप उपलब्ध नाही. परंतु हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे.
व्हिडिओ व्हायरल
Does @realDonaldTrump know he has children in Pakistan who speak Urdu & English in Punjabi? pic.twitter.com/anhRKbiLGo
— Pakistan Untold (@pakistan_untold) November 6, 2024
डोनाल्ड ट्रम्प यांचा ऐतिहासिक विजय
अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष पदासाठी तिसऱ्यांदा निवडणुकीत उतरलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी यंदाच्या निवडणुकीत विजय मिळवला आहे. 2016 मध्ये पहिल्यांदा विजय मिळवणारे ट्रम्प यांचा 2020 मध्ये जो बायडन यांच्याकडून पराभव झाला होता. मात्र यंदा रिपब्लिकन पार्टीने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आणि त्यांनी कमला हॅरिस यांचा पराभव करून बहुमताने विजय मिळवला.
या विजयामुळे डोनाल्ड ट्रम्प 132 वर्षांनंतर दोन कार्यकाळात विजयी होता दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष बनलेले व्यक्ती ठरले आहेत. याआधी ग्रोव्हर क्लीव्हलँड यांनी 1884 आणि 1892 मध्ये असेच दोन वेगवेगळ्या कार्यकाळात राष्ट्राध्यक्ष पद भूषवले होते. फ्लोरिडामध्ये विजय घोषित केल्यानंतर ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेसाठी सुवर्णकाळ आणण्याचे आश्वासन दिले.
हे देखील वाचा- पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! विजयाबद्दल कमला हॅरिस आणि जो बायडेन यांनी दिल्या शुभेच्छा