फोटो सौजन्य: सोशल मीडिया
बीजिंग: अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या बहुमताने विजय झाले आहे. डोनाल्ड ट्रम्पचे सरकार दुसऱ्यांदा सत्तेत आले. यानिमित्ताने ट्र्म्प यांना जगभरातून विविध देशाच्या पंतप्रधानांनी विजयी शुभेच्छा दिल्या. तसेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाबद्दल चीनने देखील अभिनंदन केले. याशिवाय याच माध्यमातून द्विपक्षीय संबंध वाढवण्याचे संकेत दिले. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने अमेरिकेच्या लोकांच्या निवडीचा आदर करून ट्रम्प यांना शुभेच्छा दिल्या.
चीनने द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर भर दिला
मिळालेल्या माहितीनुसार, चीनवर ट्रम्प प्रशासनाने यापूर्वीच टॅरिफ लादण्याचे धोरण राबवले होते. आता दुसऱ्यांदा ट्रम्प सत्तेत आल्याने चीनसमोर व्यापाराच्या मुद्द्यावर आव्हानं निर्माण होण्याची शक्यता आहे. या भितीमुळे चीनने द्विपक्षीय संबंध वाढवण्यावर भर दिला. डोनाल्ड ट्रम्प यांच्या मागील कार्यकाळात अमेरिकेने चीनसोबत व्यापारयुद्ध उभारले होते. अमेरिकेने चिनी उत्पादनांवर उच्च दराचे शुल्क लादले होते. यामुळे चीनला आर्थिक दृष्ट्या मोठा फटका बसला होता.
हे देकील वाचा- पुन्हा एकदा ट्रम्प सरकार! विजयाबद्दल कमला हॅरिस आणि जो बायडेन यांनी दिल्या शुभेच्छा
अमेरिका-चीन संबंधांसाठी नवीन सुरुवात
आता दुसऱ्यांदा ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्याने चीनला पुन्हा एकदा आर्थिक प्रतिबंधाचा सामना करावा लागणार का? याबाबत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, ट्रम्प यांचा दुसरा कार्यकाळ अमेरिका-चीन संबंधांसाठी “नवीन सुरुवात” म्हणून बघितला आहे. चीनने स्पष्ट केले की, अमेरिकन प्रशासनाने मतभेद आणि गैरसमज दूर करण्यासाठी चीनशी संवाद आणि संबंध दृढ करणे आवश्यक आहे.
व्यावहारिक दृष्टिकोनाची भूमिका घेण्याचे महत्त्व अधोरेखित
चीन-अमेरिका संबंधांतील तणाव तैवान, दक्षिण चीन समुद्रातील सुरक्षा मुद्दे, व्यापारविषयक विवाद, तसेच जागतिक स्थैर्याच्या संदर्भात आहे. याशिवाय “दोन महाशक्तींमधील संबंध संवादातूनच सुधारतील, यामुळे दोन्ही देशांच्या हितांचे रक्षण होईल, तसेच जागतिक स्थैर्यातही भर पडेल.” असेल चीनचे म्हणणे आहे. ट्रम्प यांच्या विजयानंतर, चीनने व्यापार आणि अन्य मुद्द्यांवरून सुरू असलेल्या संघर्षांमध्ये संवाद आणि व्यावहारिक दृष्टिकोनाची भूमिका घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले आहे.
जो बायडेन कार्यकाळ
अमेरिकेच्या धोरणांमुळे चीनवर आर्थिक आणि तांत्रिक दबाव वाढला आहे. जो बायडेन यांच्या प्रशासनानेही ट्रम्प यांचेच कठोर धोरण राबवून, चिनी उत्पादनांवर शुल्क वाढवले होते. त्यामुळे ट्रम्प यांच्या नव्या कार्यकाळात चीनला त्याच प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दडपणांचा सामना करण्याची तयारी करावी लागेल.