Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर लाइव्ह चॅनेलवर ढसाढसा रडू लागली पाकिस्तानी महिला अँकर; Video Viral
पहलगाम हल्ल्याच्या प्रतिउत्तरार्थ भारतीय सैन्याने ऑपरेशन सिंदूर राबवले. याद्वारे भारताने एकाच वेळी पाकिस्तानमधील अनेक दहशतवादी संघटनांच्या अड्ड्यांवर ल्ला केला. मंगळवारी रात्री १.३० च्या सुमारास ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय सैन्याने दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या हल्ल्याने संपूर्ण पाकिस्तान हादरल्याचे सांगण्यात येत असून आता यासंबंधीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक पाकिस्तानी अँकर लाईव्ह टीव्हीवर रडताना दिसून आली. व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, ती भारतीय हवाई हल्ल्यात मारल्या गेलेल्या पाकिस्तानी लोकांबद्दल दुःख व्यक्त करत आहे.
व्हिडिओमध्ये पाकिस्तानी अँकर रडताना बोलते की, “जे निष्पाप मेले त्यांना स्वर्गप्राप्ती होईल, त्यांच्यावर काय बेतले यावरही चर्चा होईल. देवाच्या कृपेने त्यांनी आमच्याबद्दल तक्रार करायला नको. अल्लाह आमची विनंती आहे की तो आमच्या सारख्या लोकांवर आपली कृपा ठेवेल कारण आम्ही ढासळलो आता आहोत” दरम्यान हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या हवेच्या वेगाने व्हायरल केला जात आहे. लोक या व्हिडिओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत आणि यावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत.
हा व्हायरल व्हिडिओ @Incognito_qfs नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘भावा, पाकिस्तानी मीडियाला काय झाले आहे” असे लिहिले आहे. व्हिडिओवर आता[पर्यंत लाखो लोकांनी पहिले असून अनेकांनी हा व्हिडिओ जुना असल्याचा दावा केला आहे. एका युजरने लिहिले आहे की, ती पॅलेस्टिनी मुलांबद्दल बोलत होती, हा जुना व्हिडिओ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूपच ड्रामा करत आहे”.
Bro….wtf is wrong with Pakistani Media 😂🤣😅 pic.twitter.com/bff5zZIMmV
— Incognito (@Incognito_qfs) May 7, 2025
ऑपरेशन सिंदूर ही एक भारतीय दहशतवादविरोधी कारवाई आहे. २२ एप्रिल रोजी काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली, ज्यामध्ये २६ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता. या कारवाईत, भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने एकत्रितपणे पाकिस्तान आणि पीओकेमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांवर मोठा हल्ला केला. या हल्ल्यात अनेक दहशतवादी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आले.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.