Parents put child's life at risk for reel video goes viral
सध्या लोकांना सोशल मीडियावर प्रसिद्धीचे वेड लागले आहे. लोक यासाठी धोकादायक स्टंट करत आहे. लाईक्स आणि व्ह्यूजसाठी लोक आपला जीव धोक्यात घालत आहेत. तसेच आपल्यासोबत आपल्या प्रियजणांचाही जीव धोक्यात घालत आहे. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे यामध्ये पालकांनी आपल्या चिमुकलीची जीव धोक्यात घातला आहे, तेही केवळ एका रिलसाठी. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओवर संताप व्यक्त केला आहे.
अशा जीवघेण्या स्टंटमुळे अनेकांचा भयानक अपघात झालेला आहे. मात्र तरीही लोक सुधरण्याचे नाव घेत नाही. व्हायरल होत असलेला व्हिडिओ राजस्थानमधील आहे. राजस्थानच्या भरतपूरमध्ये पालकानी आपल्या चिमुकलीचा जीव पणाला लावला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, आई-वडील आपल्या मुलीला घेऊन धरणावर भेटायला गेले आहेत. येथे धरणारवर एका रेलिंगला लागून एक खांब आहे. त्या खांबावर आपल्या काळजाच्या तुकड्याला रिलसाठी वडिलांनी बसवलेले आहे. मुलगी घाबरलेली आहे. बसण्यास नकार देत आहे, पण तरीही तिचे वडील तिला रेलिंगवर बसालयला सांगतात आणि कॅमेराकडे बघायला सांगतात. मुलगी आपल्या वडिलांचे ऐकून बसते, पण ती घाबरलेली दिसत आहे.
ही घटना ४ जुलै रोजी घडली आहे. राजस्थान्या भरतपूरमधील स्थानिक रहिवासी उमा शकंर आणि त्याची पत्नी आपल्या मुलीसह धरण पाहण्यासाठी गेले होते. यावेळी त्यंनी मुलीला धरणाच्या काठावर रेलिंग लागून असलेल्या लोखंडी खांबावर चढवले. याची रिल देखील त्यांनी बनवली. व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे की, मुलगी अगदी काठावर बसलेली आहे. चुकेनेही मुलीचा तोल गेला आणि खाली पडली तर दुर्दैवी घटना घडून शकते. परंतु तिच्या पालकांना या कोणतीही पर्वा नाही.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
याचा व्हिडिओ पालकांनी सोशल मीडियावर शेअर केला होता. परंतु काही वेळानंतर लोकांच्या तीव्र टीकांमुळे हा व्हिडिओ डिलिट करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. परंतु सध्या हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होताना दिसत आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @tellychakkar या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओवर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. लोकांकडून पालकांवर कारवाईची मागणी केली जात आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.