पाकिस्तानमध्ये पाळतू सिंहाची दहशत ; वस्तीत घुसून लोकांवर हल्ला केला अन्...; VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
अलीकडे लोकांना गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या, बैल, उंट, कुत्र, मांजर यांसारखे पाळीव प्राणी पाळायची हौस आहे. गेल्या काही वर्षात कुत्र आणि मांजर पाळणाऱ्यांची संख्या वाढली आहे. याशिवाय, अनेक मोठ मोठ्या देशांमध्ये म्हणजेच दुबईत सिंह आणि वाघाला देखील लोकांना पाळण्याचा छंद आहे. असाच छंद पाकिस्तानच्या लोकांना देखील आहे. परंतु पाकिस्तानमधील एका सिंहाच्या मालकाला त्याचा हा छंद अंगलट आला आहे.
पाकिस्तानच्या लाहौरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एक पाळीव सिंह फार्म हाऊसमधून बाहेर पळाला. त्यानंतर सिंहाने नागरी वस्तीत धाव घेतली. यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या एका महिलेला आणि तिच्या दोन मुलांना सिंहाने जखमी केले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच सिंहाच्या मालकाला अटक करण्यात आली आहे. लाहोर पोलिसांनी या संपूर्ण घटनेची माहिती दिली आहे. सध्या या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सिंह लोकांवर हल्ला करताना दिसत आहे.
लाहोरच्या पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात बुधवारी ही घटना घडली. सिंहाने पिंजऱ्यातून पळ काढला. त्यानंतर एका महिलेवर आणि तिच्या पाच वर्षाच्या मुलांवर हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहाने हल्ला केला त्यावेळी त्याचा मालक तिथेच संपूर्ण प्रकार बघत उभा होता. त्याने सिंहाला थांबवण्याचा कोणचाही प्रयत्न केला नाही. पोलिसांनी सांगतिले की, महिलेवर आणि दोन चिमुकल्यांवर हल्ला केल्यानंतर सिंह फार्म हाऊसवर पुन्हा परतला आणि तेथून त्याला वन्यजीव उद्यानात नेण्यात आले.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
#Pakistan #Lahore #women#Lion #Lionattack #Children #People
A pet lion caused panic in a residential area of Lahore after it escaped and chased a woman and her two children down a busy street
पाकिस्तान के लाहौर में एक पालतू शेर ने सड़क पर हड़कंप मच दिया। लोग पर कर दिया हमला; pic.twitter.com/R53HSc2q30— Purohit Kushal (@Purohitkushal5) July 6, 2025
सध्या पाकिस्तानमध्ये सिंहासारखे हिंसक प्राणी पाळण्याची संख्या वाढत आहे. ही बाब पाकिस्तानमध्ये अभिमानाची मानली जाते. यासाठी कायदेशीर परवानगी घ्यावी लागते. परंतु पाकिस्तानमध्ये बेकायदेशीरपणे हिंसक पाळीव प्राणी पाळले जात आहे. या घटनेनंतर पंजाब पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले आहे. आतापर्यंत ५ जणांना अटक करण्यात आली असून १३ सिंहांना जप्त करण्यात आले आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Purohitkushal5 या अकाउंटवर व्हायरल होत आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.