लग्नात एका व्यक्तीच्या विचित्र डान्स स्टेप्स पाहून लोक हैराण
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहिल्यावर आपण आश्चर्यात पडतो. तर अनेकदा चित्र विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही लग्नाच्या अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिल्या असतील. कधी नवरा-नवरीचे डान्स तर कधी कुटूंबातील सदस्यांचे डान्स, पण अनेकदा या लग्नामध्ये असेही लोक असतात ज्यांचा डान्स पाहून लोक हैराण होतात.
सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक व्यक्तीने लग्नात स्टेजवर इतका विचित्र डान्स केला आहे की, त्याला पाहून तेथील लोकही हैराण झाले आहेत. तसेच हा व्हिडिओ पाहून देखील नेटकऱ्यांनी यावर आपल्या भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. अनेकदा लोक डान्स करताना इतके विचित्र स्टेप्स करतात की पाहिल्यावर हसावे की रडावे हे कळत नाही. अशीच काहीशी अवस्था व्हिडिओ पाहणाऱ्यांची झालेली आहे.
उड्या मारत डान्स
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, लग्नात खूप धमाल सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. काही लग्नाचे पाहुणे जेवण करत आहेत तर काही डीजेवर नाचत आहेत. अचानक स्टेजपासून दूर उभ्या असलेल्या एक व्यक्ती नजरेस पडते. सुरुवातीला तो काय करणार आहे हे समत नाही. मात्र अचानक तो चित्र-विचित्र पद्धतीने उड्या मारायला सुरुवात करतो. उडी मारत तो स्टेजवर येतो आणि डान्स करू लागतो. त्याच्या डान्स स्टेप्स इतक्या विचित्र होत्या की, तिथे जान्स करत असलेले व्यक्ती तिथून निघून जातात. त्याच्यासोबत त्याचे काही मित्र देखील त्याच्याप्रमाणे नाचताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जोरदार व्हायरल होत आहे.
हे देखील वाचा – अरे देवा! लॅपटॉप स्क्रीनच्या आत मुंगी; व्हिडिओ पाहून लोक थक्क म्हणाले…
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर bridal_lehenga_designn या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. यावर अनेकांनी भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत एका युजरने म्हटले आहे की, ‘भाऊ, मला या डान्सचे नाव सांगा.’ तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, ‘मी हसत आहे.’ आणखी एका युजरने म्हटले आहे की, भाऊच्या अंगात भूत शिरलेले दिसतेय बहुतेक. तर चौथा एक युजर म्हणतो की, त्याला डान्सच्या स्पर्धेत पाठवले पाहिजे, भाऊ पहिले बक्षीस घेऊनच येईल, तर अनेकांनी यावर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.