Pune Viral Video Marathi-Hindi language dispute at Wagholi's D-Mart, video goes viral
अलीकडे मराठी बोलण्यावरुन मोठे वाद होत आहे. मुंबईमध्येही मराठी बोलण्यावरुन अनेक वाद झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच एअरटेल कस्टमर केअर ऑफिसमध्ये मराठी बोलण्यावरुन एका तरुणीने वाद घातला होता. मराठी बोलता येणे गरजेचे आहे असे तिचे म्हणणे होते. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर महाराष्ट्र बॅंकेतही कर्मचाऱ्यांनी मराठी बोलण्यास नकार दिल्याचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. सध्या पुण्यातही मराठी-हिंदीवरुन वाद उफाळून आला आहे. पुण्याच्या वाघोली येथील डी-मार्टमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
वाघोलीच्या डी-मार्टमध्ये दोन नवरा-बायको हिंदीत बोलत होते. याच वेळी त्यांना एक व्यक्ती एक व्यक्ती त्यांना मराठी बोलायला सांगतो. यावरुन मोठा वाद सुरु होतो. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक नवरा-बायको सामान घेऊन जात आहे. ते हिंदीत बोलत आहेत. तर त्याच वेळी एक माणूस त्यांना मराठीत बोला असे म्हणतो. तर तो व्यक्ती हिंदी ही बोलेंगे असे म्हणतो, दुसरा व्यक्ती त्याला मराठी बोलण्याचा आग्रह करत असतो आणि याचा व्हिडिओ रेकॉर्ड करत असतो. दुसरा माणूस त्याला मराठी बोलण्यास नकार देतो आणि त्याला व्हिडिओ बनवण्याचा अधिकारा नाही, हे चूकीचे आहे असे म्हणत असतो. याचवेळी एक व्यक्ती मारहाणीची प्रयत्न देखील करतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
Pune Viral Video
‘Hindi Hi Bolenge’: Man insists on speaking Hindi after being asked to speak Marathi at D-Mart in Wagholipic.twitter.com/w1yhi1qnH4
— Pune First (@Pune_First) March 13, 2025
व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Pune_First या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे. अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने ‘महाराष्ट्रातील लोकांना मराठी बोलता आले पाहिजे असे म्हटले आहे,’ तर दुसऱ्या एका युजरने ‘प्रत्येकाला त्याला येत असलेली भाषा बोलण्याचा अधिकार आहे’ असे म्हटले आहे. तर आणखी एकाने आपण शिक्षणासाठी बाहेर गेल्यावर तेथील भाषा, इंग्रजी, जर्मनी व इतर भाषा शिकण्याचा प्रयत्न करतो मग महाराष्ट्रात येऊन मराठी का शिकता येत नाही असा प्रश्न केला आहे. अशा अनेक संमिश्र प्रतिक्रिया व्हिडिओवर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.