शेतकऱ्यांसाठी वरदान की संकट? शेतात वेगाने काम करणाऱ्या रोबोटचा Video Viral (फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट)
अलीकडच्या काळात लोकांच्या जीवनशैलीत आणि तंत्रज्ञानात मोठे बदल झाले आहे. या नव्या विकसित तंत्रज्ञानाच्या मदतीने माणसाचे जीवन अधिक सुलभ बनत चालले आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि रोबोटिक्सचा मोठा वाटा आहे. उद्योग, वैद्यकीय क्षेत्र, वाहतूक घरगुती कामे आणि शेती यामध्ये अलीकडच्या काळात रोबोट्सचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. सध्या असाच एका व्हिडिओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ चर्चेचा विषय बनला आहे. यामध्ये चक्क एक रोबोट शेतात काम करताना दिसत आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता कीस एक रोबोट शेतात काम करत आहे. रोबोट वाऱ्याच्या वेगाने आणि अतिशय कौशल्याने शेतातील रीक कापताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. तसेच अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कष्ट कमी होउ शकतात. मात्र, काहींनी याबद्दल शंका व्यक्त केली आहे. कारण मशिनच्या वाढता वापरामुळे मनुष्यबळाची गरज कमी होईल. यामुळे लोकांच्या रोजगारावर परिणाम होण्याची भिती अनेकांनी व्यक्त केली आहे.
खरंतरं हा व्हिडिओ AI च्या मदतीने तयार करण्यात आला आहे. मात्र असे झाल्यास मोठ्या प्रमाणावर लोकांच्या रोजगारावर परिणाम होईल असे म्हटले जात आहे. अलीकडे AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने असे व्हिडिओ, फोटो तयार केले जातात. हे फोटो आणि व्हिडिओ अगदी वास्तविक आयुष्यासारखे वाटतात. मात्र प्रत्यक्षात अस्तित्वात नसतात. यामुळे हा व्हिडिओ सत्य आहे की तांत्रिक जादू असा प्रश्न निर्माण होतो.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
व्हायरल व्हिडिओ
क्या इस खतरे से आप वाक़िफ़ है? pic.twitter.com/q5z78oBv2k
— Basant Maheshwari (@BMTheEquityDesk) March 12, 2025
शेतीसाठी रोबोट तयार करणे हे भविष्यात नक्कीच फायदेशीऱ ठरले. शेतातील कामे लवकर होती. कमी वेळात जास्त उत्पादन होऊ शकते. कामांची गती वाढेल आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उत्तम गुणवत्तेचे उत्पादन होईल. मात्र, यामुळे मजुरांच्या रोजगारावर परिणाम होईल अशा शक्यता आहे. तंत्रज्ञान हे माणसांच्या सोयीसाठी बनवण्यात आले आहे, पण हे भविष्यात धोकादायकही ठरु शकते असे अनेकांचे म्हणणे आहे. यामुळे रोबोटिक्स आणि AI चा वापर संतुलित होणे गरजेचे आहे अस तज्ज्ञांनी म्हटले आहे.व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @BMTheEquityDesk या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला लाखो लाइक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहे.
व्हायरल बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.