'उधारी बंद, पेशंट कमी आले तरी चालतील'; दवाखन्याबाहेर पेशंटसाठी डॉक्टरच्या अनोख्या सुचना; पाहून हसू आवरणार नाही
सोशल मीडियावर रोज लाखो गोष्टी पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात की पाहून आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की हसू आवरणे कठीण होऊन जाते. कधी भांडण, कधी जुगाड तर कधी स्टंट असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. तसेच तुम्ही अनेक पुणेरी पाट्या देखील सोशल मीडियावर पाहिल्या असतील.
पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभाव, तसेच पुणेरी पाट्यासाठी ओळखले जातात. पुणेरी पाट्या तर नेहमी चर्चेत असतात. जेव्हा पण कोणी पुण्याचा विचार करत असेल त्याच्या मनात पहिल्यांदा पुणेरी पाट्या येतील. सध्या अशीच एक पुणेरी पाटी सोशल मीडियावर मोठ्या प्रमामात चर्चेत आहे. ही पुणेरी पाटी एका दवाखान्याच्या बाहेर लावण्यात आली आहे. ही पाटी पाहून तुम्हाला तुमचे हसू आवरणे कठीण होऊन जाईल.
भन्नाट पुणेरी पाटी
व्हायरल होत असलेल्या पोस्टमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका दवाखन्याबाहेरची काही सुचना लावलेल्या आहे. डॉक्टराने पेशंटसाठी काही विषेष सुचना तयार केल्या आहे. यामध्ये डॉक्टरने म्हटले आहे की, उधारी बंद आहे, पेशंट कमी आले तर चालतील अशी पहिली सुचना आहे. तसेच मी डॉक्टर आहे तुमचा कुलदैवत नाही, त्यामुळे प्रत्येक आजार बरा होईल याची अपेक्षा ठेवू नका. पेशंटने लुंगी, बरमुडा घालून दवाखन्यात यायचे नाही कारण हे चेन्नई नाही असे देकील यावर लिहिलेले आहे. याशिवाय लवकर बरे व्हायचे असेल तर इंजेक्शन घ्यायची तयरी ठेवायची उगच येथे येभन आरडा-ओरडा करायचा नाही. असे सगळे स्पष्ट शब्दामध्ये या पुणेरी पाटीवर लिहिलेले आहे.
हे देखील वाचा- बाप रे! महिलेने सापांना कपड्यांप्रमाणे धु धु धुतले अन्; व्हिडिओ तुफान व्हायरल
व्हायरल पोस्ट
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेली पोस्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्म universe_marathi या अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. या पोस्टला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. अनेकांनी यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, त्याचे बरोबर आहे, तर दुसऱ्या एकाने लिहिले आहे की, पुणकरांचा नाद नाही करायचा. तिसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, या डॉक्टरला चांगलाच अनुभव आलेला दिसतोय. अशी अनेक मजेशीर प्रतिक्रीया लोकांनी केल्या आहेत. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
टीप– हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.