फोटो सौजन्य: व्हिडिओ स्क्रीनशॉट
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल सांगता येत नाही. अनेकदा असे विचित्र व्हिडिओ पाहायला मिळतात की पाहून मन अगदी खराब होऊन जाते. तर अनेकदा असे व्हिडिओ पाहायला मिळतात की, जे पाहिल्यावर आश्चर्याचा धक्का बसतो. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण हैराण झाले आहे. तुम्ही देखील हा व्हिडिओ पाहिल्यावर चक्रावून जाल.
तुम्ही सापांशी संबंधित अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिले असतील. हा व्हिडिओ देखील सापाशी संबंधित आहे. सहसा आपण साप दिसला की त्याच्यापासून लांब पळतो. किंवा त्याला पकडून दूर फेकून येतो. पण व्हायरल होत असेलेला व्हिडिओ काही वेगळाच आहे. त्यात एक महिलेने सापाला हाताने आंघोळ घालत आहे. हा साप सामान्य साप नसून किंग कोब्रा आहे. या महिलेने कोणतीही भिती न बाळगता असे केले आहे की पाहून अनेकजण चक्रावले आहेत.
सापाला टपात घालून अंघोळ
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका महिलेने एक मोठा साप हातात धरला आहे. ती त्या सापाला जवळच एक पाण्याने भरलेल्या टब आहे. ती त्या एका टपात एका सापाला टाकते. नंतर त्याला बुडवून आंघोळ घालते. दरम्यान, शेजारीच दुसरा आणखी एक साप फणा पसरून बसला आहे. महिला सापाला टबमध्ये सोडते आणि साप टबमधून बाहेर येतो. ती त्या सापाला बाळाला अंघोळ घालतात तशी धुते. हा व्हिडिओ प्रचंड सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर si_kirtan या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रीया देखील दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, शेवटी ती स्त्री आहे काहीही करू शकते, तर दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, भाऊ, मी तर घाबरलो, सापांना नाही बाईला. तर अनेकांनी हैराण झाल्याच्या इमोजी व्हिडिओवर शेअर केल्या आहेत. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळालेले नाही. हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.