Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

साठ-सत्तर वर्षांची वाट पाहिली… आज्जी-आजोबांनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून युजर्स भारावले; Video Viral

Old Couple Cute Video : मुंबईत पहिल्यांदाच आलेल्या आज्जी-आजोबांनी जीवनाच्या शेवटीस अखेर समुद्रकिनारा पहिलाच! लाटांचा स्पर्श होताच दोघांनी एकमेकांचा हात घट्ट धरला अन् त्यांच्या प्रतिक्रियेने युजर्सना भारावून टाकलं.

  • By नुपूर भगत
Updated On: Jan 11, 2026 | 09:08 AM
साठ-सत्तर वर्षांची वाट पाहिली… आज्जी-आजोबांनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून युजर्स भारावले; Video Viral

साठ-सत्तर वर्षांची वाट पाहिली… आज्जी-आजोबांनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून युजर्स भारावले; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • आज्जी-आजोबांनी संपूर्ण आयुष्यात कधीही समुद्र पाहिला नव्हता.
  • पहिल्यांदा समुद्रकिनारा पाहताच ते खुश झाले आणि त्यांनी थेट नमस्कारच केला.
  • या छोट्या कृतीतून त्यांच्या श्रद्धा, संस्कार आणि आयुष्यभराचं एकमेकांवरील प्रेम प्रकर्षाने दिसून आलं.
सोशल मिडियावर अलिकडे एका आज्जी-आजोबांचा व्हिडिओ खूप जास्त व्हायरल होत आहे. वय सरताना अखेर आपल्या जीवनाच्या शेवटीस आज्जी-आजोबांनी समुद्रकिनारी जाऊन लाटाच्या प्रवाहांत सुंदर वेळ घालवला. सांगण्यात येत आहे की, आपल्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी कधीही समुद्रकिनारा पाहिला नाही आणि जेव्हा पहिल्यांदा त्यांनी समुद्रकिनाऱ्याची मजा लुटली तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू उमललं. आज्जी-आजोबांची रिॲक्शन आता यूजर्सना चांगलीच खुश करत असून लोक वेगाने हा व्हिडिओ शेअर करत आहेत. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

भारताचं Venice माहितीय का? परदेशी पर्यटाकाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून भारतीय म्हणून वाटेल अभिमान

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, वृद्ध जोडपे हळूहळू समुद्राच्या पाण्यात पाऊल ठेवताना दिसून येतात. लाटा त्यांच्या पायांनी स्पर्श करत असतात आणि त्या हळूवार लाटांचा स्पर्श होताच दोघांच्याही चेहऱ्यावर हलका उत्साह आणि आनंद पसरतो. नारंगी लुगडं आणि पांढरे धोतर परिधान केलेले आजी आजोबा हात धरून समुद्रकिनारी उभे असतात. ते क्षणभर थांबतात, समुद्राकडे पाहतात आणि नंतर आदराने हात जोडून नमस्कार करतात. जणू समुद्रकिनारा पाहून त्यांच जीवनच सार्थकी लागलं. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले होते की, ‘ते एखाद्या सहलीबद्दल किंवा समुद्रकिनाऱ्याबद्दल नव्हते. ते त्यांना अशा गोष्टी पाहण्यासाठी घेऊन जाण्याबद्दल होते ज्याबद्दल त्यांनी आयुष्यभर फक्त ऐकले होते. समुद्र पाहण्याची त्यांची पहिलीच वेळ. त्यांना पाण्याला स्पर्श करताना आणि नमस्कार करताना पाहणे म्हणजे शुद्ध श्रद्धा कशी दिसते याची आठवण करून देते. काही क्षण हे कायमचे हृदयात राहतात’.

Labubu ला केला रिप्लेस, Mirumi ने केला ट्रेंड सेट! अरे गोंडसपणाला काही हद्द, Viral Doll

हा व्हिडिओ @shortgirlthingss नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “डोक्यावर पदर अन् टोपी असणारी शेवटची जोडी” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “थरथरत्या हातांनीही एकमेकांचा हात किती घट्ट धरून ठेवलाय,मिस यू आजीदादा” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ते किनारपट्टीच्या भागांपासून खूप दूर राहत होते आणि त्यांना त्यांच्या गावाबाहेर जाण्याची संधी कधीच मिळाली नाही. त्यांच्यासाठी जीवन म्हणजे जबाबदाऱ्या, कठोर परिश्रम आणि त्यांच्या मुलांचे भविष्य चांगले असावे याची खात्री करणे. त्या काळात प्रवास किंवा समुद्र पाहण्यासारखे अनुभव कधीच प्राधान्य नव्हते. दुसरीकडे, आपण भाग्यवान आहोत की आपण शहरात राहतो, कुठेही, कधीही प्रवास करण्याचे स्वातंत्र्य आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Video viral grandma grandpa saw sea for the first time in their life viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 09:07 AM

Topics:  

  • grandma
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भारताचं Venice माहितीय का? परदेशी पर्यटाकाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून भारतीय म्हणून वाटेल अभिमान
1

भारताचं Venice माहितीय का? परदेशी पर्यटाकाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून भारतीय म्हणून वाटेल अभिमान

Labubu ला केला रिप्लेस, Mirumi ने केला ट्रेंड सेट! अरे गोंडसपणाला काही हद्द, Viral Doll
2

Labubu ला केला रिप्लेस, Mirumi ने केला ट्रेंड सेट! अरे गोंडसपणाला काही हद्द, Viral Doll

“गजनी, खिलजी, औरंगजेब आए…”; Somnath Temple हल्ल्याला 1 हजार वर्ष अन् पंतप्रधान मोदींनी पोस्ट केला VIDEO
3

“गजनी, खिलजी, औरंगजेब आए…”; Somnath Temple हल्ल्याला 1 हजार वर्ष अन् पंतप्रधान मोदींनी पोस्ट केला VIDEO

Chinese Trump चा हा व्हिडिओ पाहिला का? बोलण्याची स्टाईल पाहून तुम्हीही डोकं खाजवाल, Video Viral
4

Chinese Trump चा हा व्हिडिओ पाहिला का? बोलण्याची स्टाईल पाहून तुम्हीही डोकं खाजवाल, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.