खरी रणरागिणी! नोकरीच्या बहाण्याने रेस्ट रूममध्ये बोलावणाऱ्या सब-इंजिनियरला तरुणीने दिला चपलांचा मार, Video Viral
आताच्या काळात एक उत्तम नोकरी मिळवणे काही सोपे नाही. नोकरीचा मोह दाखवून फसवणूक केल्याच्या अनेक घटना येत्या काळात समोर आल्या आहेत. त्यातही बऱ्याचदा यात महिलांवर खास करून निशाणा साधला जातो. अनेकदा त्यांची फसवणूक अथवा त्यांच्यासोबत गैरवर्तन केली जाते. नोकरीचे आमिष दाखवून महिलांवर अत्याचार झाल्याच्या कितीतरी घटना नुकत्याच समोर आल्या आहेत. त्यातच आता घटना सोशल मीडियावरही अशीच एक व्हायरल झाली आहे.
या घटनेविषयी आता सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. माहितीनुसार, सदर घटना ही मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधील आहे. येथील पीडब्ल्यूडीमधील सब-इंजिनियर रामस्वरुप कुशवाहा याने एका तरुणीला नोकरी देण्याचे प्रलोभन देत एका रेस्ट रूममध्ये बोलावून घेतले. तरुणी त्याच्या सांगण्याप्रमाणे डबरा रेस्ट हाऊसवर पोहोचली, पण तिथे पोहोचताच सब-इंजिनियरने तिच्यावर गैरवर्तन करण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे तरुणी संतापली आणि तिने सब-इंजिनियरला रेस्ट हाऊस रुममध्येच अक्षरशः चपलेने मारहाण करण्यास सुरुवात केली.
कधीही न पाहिलेलं दृश्य! एकमेकांना गुंडाळलं अन्…सापांच्या रोमॅंटिक कपल डान्सचा Video Viral
काय आहे व्हिडिओत?
या घटनेच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घटनेची काही दृश्ये दिसून येतील. यात पाहिले तर दिसते की, तरुणी तू माझे आयुष्य उद्ध्वस्त केलेस असे म्हणत सब-इंजिनियरला मारहाण करत आहे. रागात शिवीगाळ करत तिने तरुणाचे थोबाड चपलेने पार चोपून काढले. दरम्यान, तरुणी आपल्या मित्रासह नोकरीची विचारणा कारण्यासाठी येथे गेली होती. यावेळी या सब-इंजिनियरने मुलाखतीसाठी तिला रेस्ट रूममध्ये येण्यासाठी बोलावून घेतले. तिथे गेल्यानंतर सब-इंजिनियर तिच्यासोबत गैरवर्तन करू लागला.
मुख्य म्हणजे तरुणीने विरोध करताच तो तिच्यासोबत जबरदस्ती करू लागला. ज्यामुळे तरुणी संतापली आणि तिने थेट आपली चप्पल काढत त्याला मारायला सुरुवात केली. यावेळी तिच्याबरोबर आलेल्या तिच्या मित्राने घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. यानंतर तिच्याबरोबर आलेल्या तिच्या मित्राने घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला. यावेळी सब-इंजिनियर अपमानित होत काहीही न बोलता घटनास्थळावरून पळून गेला.
नेता नाहक बदनाम है। इंजीनियरों की हरकत पर गौर कीजिए। ग्वालियर में पीडब्ल्यूडी के सब इंजीनियर रामस्वरूप कुशवाहा ने एक लड़की को नौकरी का झांसा देकर डबरा रेस्ट हाउस बुलाया और गलत हरकत की। युवती ने इंजीनियर को चप्पलों से पीटा।@MPPoliceDeptt pic.twitter.com/8XQa2JQJVZ
— Naval Kant Sinha | नवल कान्त सिन्हा (@navalkant) December 9, 2024
अचानक स्फोट होताच रस्त्याच्या आत खेचली गेली तरुणी, थरारक अपघात अन् धडकी भरवणारा Video Viral
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ @navalkant नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेविषयीची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तरूणांनी हेही समजून घेतले पाहिजे की सरकारमध्ये भरतीची एक निश्चित प्रक्रिया आहे, अगदी कंत्राटी पद्धतीने कोणीही नोकऱ्या देऊ शकत नाही. या अभियंत्याच्या मालमत्तेचीही चौकशी झाली पाहिजे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अगदी बरोबर. हे लोक असेच सुधारतील आणि त्याला मारहाण करायला हवी होती, व्हायरल करा म्हणजे याची आणखीन बदनामी होईल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.