विशालकाय अजगराने वाघावर केला हल्ला, क्षणात मान पकडली अन् जंगलाच्या शिकाऱ्याला असा गिळू लागला की...थरारक Video Viral
सोशल मीडिया एक असे ठिकाण आहे जिथे नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. हे एक असे ठिकाण आहे जिथे तुम्हाला अनेक विचित्र गोष्टी पाहायला मिळतील ज्यांचा तुम्ही कधी स्वप्नातही विचार केला नसेल. इथे बऱ्याचदा प्राण्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल होतात, ज्यात शिकारीचे भयाण दृश्य दिसून येते. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. जंगलाचा नियम आहे, इथे बलवान प्राणी नेहमीच कमकुवत प्राण्यांची शिकार करतात. या शिकाऱ्यांमध्ये वाघाचे नाव अग्रस्थानी! वाघ नेहमीच आपल्या ताकदीच्या बळावर प्राण्यांची शिकार करताना दिसून येतो मात्र आताच्या व्हायरल व्हिडिओमध्ये वाघ स्वतःच शिकार झाल्याचे दिसून आले आहे. होय, यावेळी सिंहाने नाही तर सिंहाचीच शिकार झाली आहे. या अनोख्या शिकारीने सर्वचजण हादरून गेले असून वाघाची ही हार आता अनेकांना थक्क करत आहे. व्हिडिओत नक्की काय घडले ते चला सविस्तर जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल व्हिडिओमध्ये, एका विशालकाय अजगराने वाघाची पाण्यात शिकार केल्याचे आढळून आले. जसे वाघ हा जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी मानला जातो तर अजगर देखील पाण्यातील एक भयानक शिकारी म्हणून ओळखला जातो. व्हिडिओत दिसून आलेल्या दृश्यांवर, अजगराने जंगलाच्या शिकाऱ्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले असून आपल्या शरीराने त्याने वाघाभोवती विळखा घातल्याचे दिसून आले. अजगराचा हा विळखा इतका जबरदस्त असतो की वाघ त्यापुढे हताश होऊन आपली हार मानतो. वाघाची ही हार फार दुर्मिळ असून याचा व्हिडिओ आता इंटरनेटवर धुमाकूळ माजवत आहे.
हा व्हिडिओ व्हायरल होत असतानाच, अनेक सोशल मीडिया युजर्सने हा व्हिडिओ खरा नसून तो एआय तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आल्याचा दावा केला आहे. खरं तर, वाघ आणि अजगर यांच्यातील असा सामना वास्तविक जीवनात जवळजवळ अशक्य आहे कारण वाघ सहसा अशा धोक्यांपासून दूर राहतात आणि अजगर वाघांसारख्या मोठ्या भक्षकांवर हल्ला करणे देखील टाळतात. अशात व्हिडिओतील हे दृश्य घडणे फारच दुर्लभ आणि अशक्य असे आहे. हा व्हायरल व्हिडिओ @wildanimalnaturelife नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला लाखो युजर्सने पाहिले असून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “साहजिकच हे एआय आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “जंगलाच्या राजाचे हे हाल कोणी केले”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.