(फोटो सौजन्य: X)
पहलगाम हल्ल्याच्या बदला घेण्यासाठी भारताकडून ऑपरेशन सिंदूर राबविण्यात आले. या हल्लयाअंतर्गत पाकिस्तानमधील तब्बल ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला करण्यात आला. अजूनही दोन्ही देशांमध्ये युद्धाचे वातावरण असून हा मुद्दा आता जगभर एक चर्चेचा विषय बनला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर हल्ला केल्यानंतर याचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले गेले. यातील बरेच व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल देखील झाले. त्यातच आता यासंबंधित आणखीन एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसून आला. मात्र यात हल्ल्याचे दृश्य नसून काही भावनिक दृश्ये दाखवण्यात आली जी पाहून सर्वांच्याच डोळ्यात अश्रू आले.
देशात युद्धजन्य परिस्थिती असल्याने जवानांना त्वरित बोलवण्यात येत आहे. अशातच यात सुट्टीवर असलेल्या मनोज पाटीललाही सीमेवर बोलावण्यात आले. विशेष म्हणजे, मनोजचे नुकतेच लग्न झाले असून लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी त्याला देशसेवेसाठी तात्काळ ड्युटीवर बोलवण्यात आले. अंगावरची हळद ओली असतानाच हातावर रंगलेल्या मेहंदीसह मनोजची पत्नी त्याला निरोप द्यायला रेल्वे स्थानकावर पोहचली.
यावेळी मनोजचे संपूर्ण कुटूंब तेथे उपस्थित होते. व्हिडिओमध्ये तुम्ही कुटुंबाचे निराशाजनक चेहरे पाहू शकता. अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आणि आपल्या पतीच्या येण्याची आस मनात ठेवत पत्नी यामिनी हिने मनोजला निरोप दिला. निरोपाचा हा दुःखद व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे. देशसेवेसाठी मनोजने ओल्या हळदीने पोस्टींवर रवाना होण्याचा निर्णय घेतला. त्याच्या हे धाडसी पाऊल पाहून अनेकजण आता मनोजचे कौतुक करत आहेत तर लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नववधूवर अशी वेळ आल्याने लोक भावुक होऊन खंत देखील व्यक्त करत आहेत.
सगळ काही भारत मातेसाठी…
लग्नाच्या तीन दिवसांनंतर महाराष्ट्राचे सुपूत्र मनोज पाटील देश सेवेसाठी रवाना… #oprationsindoor #IndianNavyAction #IndiaPakistanTensions #jalgaonnews #India #army #manojpatil #देशसेवा pic.twitter.com/1gmbhYcoTD— Ganesh Pokale… (@P_Ganesh_07) May 9, 2025
दरम्यान ५ मे रोजी मनोज आणि यामिनचा विवाहसोहळा पार पडला होता. लग्नाचे दोन दिवस उलटत नाही तितक्यात मनोजला ऑन ड्युटी हजर राहण्यासाठी बोलावणे आले. यानंतर लग्नाचे सर्व कार्यक्रम रद्द करून मनोज आपल्या ड्युटीवर परतला.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.