Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

७७ वर्षांची प्रतीक्षा संपली! गावात पहिल्यांदाच पोहोचली सरकारी बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना; Video Viral

Viral Video : काय सांगता... स्वातंत्र्यानंतर गावात पहिल्यांदाच दाखल झाली सरकारी बस? गावकऱ्यांनी फुलांच्या माळांनी साजरा केला आनंद. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून यूजर्सने व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 08, 2026 | 08:48 AM
७७ वर्षांची प्रतीक्षा संपली! गावात पहिल्यांदाच पोहोचली सरकारी बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना; Video Viral

७७ वर्षांची प्रतीक्षा संपली! गावात पहिल्यांदाच पोहोचली सरकारी बस, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • राजस्थानच्या भवानी गावात तब्बल ७७ वर्षांनंतर पहिल्यांदाच सरकारी बस पोहोचली.
  • बसच्या स्वागतासाठी गावकऱ्यांनी फुलांनी सजावट करत जल्लोष केला आणि चालक-कंडक्टरचेही स्वागत केले.
  • मूलभूत सुविधेसाठी गावकऱ्यांनी व्यक्त केलेला आनंद सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला.
बऱ्याचदा आपल्याला सामान्य वाटणाऱ्या गोष्टी इतर कुणासाठी तरी त्यांचे स्वप्न असतात. बऱ्याच काळापासून कोणत्या गोष्टीची वाट पाहिली आणि ती अखेर ती गोष्ट प्राप्त झाली की मनाला एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळते. शहरांमधील प्रगतीचे झपाट्याने वाढत असली तरी देशात आजही असे काही भाग आहेत जिथे मूलभूत सुविधांचा अभाव पाहायला मिळतो.

शेवटी आईच ती…! पिल्लाच्या भेटीसाठी कासाविस झाली मांजर, भिंतीवरुन खाली कोसळली अन् तिची धडपड पाहून यूजर्स झाले भावूक

अलिकडे सोशल मिडियावर राजस्थानच्या केकडी जिल्ह्यातील भवानी गावातील एक घटना शेअर करण्यात आली आहे.दाव्यानुसार, ७७ वर्षांपासून गावात सरकारी बस व्यवस्था नव्हती, अशात पहिल्यांदाच सरकारी बस गावात दाखल होताच गावकऱ्यांना वेगळाच आनंद मिळाला. बसला येताना पाहून लहान मुलांसह मोठही खुश झाले आणि सर्वांनी आनंद साजरा करायला सुरुवात केली. ही घटना सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत असून बससाठी गावकऱ्यांनी व्यक्त केलेला आनंद पाहून अनेकांचा ऊर भरुन आला आहे.

व्हिडिओत काय दिसलं?

व्हिडिओच्या सुरुवातीलाच रस्त्याच्या कडेला लहान आणि मोठी अशी बरीच मंडळी एकत्रित जमा झाल्याचे दिसते. काही वेळाने आपल्याला समोरुन एक सरकारी बस येताना दिसते. गावात पहिल्यांदाच सरकारी बस आल्याने गावकरी भारीच खुश झाले. तरुणांनी आपल्या स्मार्टफोन बाहेर काढला आणि बसचे दृष्य आपल्या फोनच्या कॅमेरात कैद करण्यास सुरुवात केली. सांगितले जात आहे की, १९४७ मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कोणतीही नियमित सरकारी रोडवेज बस थेट या गावात पोहोचली नव्हती. अनेक दशकांपासून, येथील रहिवाशांना वैद्यकीय उपचार, शिक्षण किंवा कामासाठी शहरात जाण्याकरिता मैलोमैल चालावे लागत होते किंवा खाजगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत होते.

राजस्थान राज्य रस्ते वाहतूक महामंडळाची बस जेव्हा गावात दाखल झाली तेव्हा गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. लोकांनी राष्ट्रीय उत्सवाप्रमाणे बसच्या आगमणाचा आनंद साजरा केला. बसला फुलांनी सजवण्यात आले, ड्रायव्हार-कंडक्टरचे थाटात स्वागत करण्यात आले. कोणी विशेष अतिथी गावात आलाय अशाप्रकारे गावकरी बसच्या आगमणाची वाट पाहत राहिले आणि बस येताच मोठ्या आनंदाने तिचे स्वागत त्यांनी केले.

यमराज सुट्टीवर गेले का? जंगलात सिंहांच्या कळपातून साधू बिनधास्त चालत गेला, निडरता पाहून जंगलाचा राजाही थबकला; Video Viral

हा व्हिडिओ @foofaji नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या घटनेवर सोशल मिडिया यूजर्सने आपल्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये व्यक्त केल्या आहेत. एका यूजरने म्हटले की, “गावात व्यवस्था नाही आणि भारत चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पूर्वी ही बस चालत होती, आता पुन्हा तिला सुरु करण्यात आलं आहे, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “आमच्या गावातही बस अजून आली नाही आणि असे अनेक गाव आहेत”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Rajasthan bhawani village government bus first time after 77 years viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 08, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • rajasthan
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

शेवटी आईच ती…! पिल्लाच्या भेटीसाठी कासाविस झाली मांजर, भिंतीवरुन खाली कोसळली अन् तिची धडपड पाहून यूजर्स झाले भावूक
1

शेवटी आईच ती…! पिल्लाच्या भेटीसाठी कासाविस झाली मांजर, भिंतीवरुन खाली कोसळली अन् तिची धडपड पाहून यूजर्स झाले भावूक

Ahilyanagar News: ‘लेडी सिंघम’ची जोरदार कारवाई: हुकूमशाही आणि अडथळ्यांना न जुमानता कारवाईचा धडाका!
2

Ahilyanagar News: ‘लेडी सिंघम’ची जोरदार कारवाई: हुकूमशाही आणि अडथळ्यांना न जुमानता कारवाईचा धडाका!

यमराज सुट्टीवर गेले का? जंगलात सिंहांच्या कळपातून साधू बिनधास्त चालत गेला, निडरता पाहून जंगलाचा राजाही थबकला; Video Viral
3

यमराज सुट्टीवर गेले का? जंगलात सिंहांच्या कळपातून साधू बिनधास्त चालत गेला, निडरता पाहून जंगलाचा राजाही थबकला; Video Viral

‘१० मिनिटं माझे बाबा व्हाल का?’ चिमुकल्याने रायडरकडे केली अनोखी मागणी, कारण ऐकून यूजर्सच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral
4

‘१० मिनिटं माझे बाबा व्हाल का?’ चिमुकल्याने रायडरकडे केली अनोखी मागणी, कारण ऐकून यूजर्सच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.