
rapido driver misbehave with Bengaluru woman during ride Video goes viral (1)
गेल्या काही काळात मुलींवर अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून अत्याचाराच्या घटना समोर येत आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. दोन दिवसांपूर्वीच कर्नाटकमध्ये बसमध्ये एका व्यक्तीने तरुणीसोबत गैरवर्तन केले होते. याचा व्हिडिओ बनवत तरुणीने धैर्याने स्वत:सोबत घडलेला प्रकार समोर आणला. तिच्यासोबत गैरवर्तन करणाऱ्याला योग्य सबक शिकवला.
आता याच घटनेच्या दोन दिवसानंतर आणखी एक व्हिडिओ पाहायला मिळत आहे. एका रॅपिडो ड्रायव्हरने राइड वेळी तरुणीसोबत गैरकृत्य केले आहे. तरुणीने या घटनेचा व्हिडिओ काढला आणि सोशल मीडियावर शेअर केला. सध्या या व्हिडिओने सोशल मीडियावर संतापचा लाट उसलळी आहे.
बेंगळुरू येथील तरुणीने व्हिडिओ शेअर करत या घटनेची माहिती दिली आहे. ही तरुणी पीजीवर रुमवर जाण्यासाठी रॅपिडो बाईक बुक करते. पण तिच्यासोबत जे घडते ते धक्कादायक आहे. ६ नोव्हेंबरच्या संध्याकाळी ४ च्या सुमारास ही घटना घडली आहे. तरुणीने रॉपिडो राइड बूक केली होती. लोकेश नावाचा ड्रायव्हर या तरुणीला ड्राप करण्यासाठी आला. पण बाईक राईड दरम्यान लोकेश सतत तरुणीच्या पायांना हात लावत होता. तरुणी प्रचंड घाबरलेली होती. याच वेळी तिने या घटनेचा व्हिडिओ शूट केला.
व्हिडिओ मध्ये पाहू शकता की, ड्रायव्हर लोकेश तिच्या पायाला हात लावताना दिसत आहे. तरुणीनी देखील रडताना दिसत आहे. तरुणीने सांगितले की, ती घाबरली असल्याने आणि त्या एरियामध्ये नवीन असल्याने तिने गाडी थांबवण्यास देखील सांगितले नाही. यानंतर उतरल्यावर तिथे असलेल्या एका व्यक्तीला तिने या घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्या दुसऱ्या व्यक्तीने ड्रायव्हराला फटकारले. तरुणीची माफी देखील मागायला लावली. हा सर्व घडलेला प्रकार तरुणीने कॅप्शनमध्ये शेअर केला आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @s4dhnaa या अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत अनेकांनी पाहिले असून तीव्र संताप व्यक्त केला आहे. अनेकांनी लोकेश विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यास सांगितले आहे. त्याला असेच सोडले तर तो पुन्हा कोणत्या तरी मूलीसोबत गैरवर्तन करेल असे लोकांचे म्हणणे आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.