मुंबईकरांचा नाद नाही! मैत्रीसाठी लोकलमध्येच थाटलं केळवण; डोकेरेशन, पंचपक्वान, फोटोसेशन अन्..., VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. यामध्ये तुम्ही मुंबई लोकचे तर अनेक व्हिडिओ पाहिले असतील. मुंबई लोकल ही तेथील लोकांच्या जीवनाचा एक भागच बनली आहे. यामुळे तुम्ही लोकमध्ये लोकांना किर्तन करताना, गाण्याचा कार्यक्रम, बायकांना हळदी-कुंकवाचा कार्यक्रम करताना पाहिले असतील. दिवसभराच्या धावपळीनंतर संध्याकाळच्या निवांत वेळी मुंबई लोकलमध्ये अशी दृश्ये दिसून येतात. याचे व्हिडिओ देखील तुफान व्हायरल होत असतात.
आता तुम्हाला माहितच असेल की, सध्या सर्वत्र लगीन-सराई सुरु आहे. यामुळे अनेकांच्या घरी लग्न ठरलेल्या तरुण-तरुणीला केळवणासाठी बोलावले जात आहे. केळवण हा कार्यक्रम लग्न ठरलेल्यांसाठी लग्नाआधी केला जातो. यावेळी लग्न ठरलेल्या तरुण-तरुणीला घरी बोलावनू त्यांच्यासाठी पंच्चपक्वान, गोड-धोड जेवण भरवले जाते. त्यांच्यासाठी खास सजावट केलेली असते. पण अलीकडच्या धावपळीच्या जीवनात काहींना सर्वांच्याच घरी जाणे शक्य होत नाही, मुंबई सारखे शहर असेल तर त्यात निवांतपण मिळणे जरा कठीणच म्हणायचे. या मैत्रीणींना आपल्या मैत्रीणीचे केळवणे ट्रेनमध्येच केले आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, ट्रेनचा डब्बा पाणा-फुलांना, हारांना सजवण्यात आला आहे. लग्न ठरलेल्या मैत्रीणीसाठी खास गोड-धोड जेवणही आणले आहे. सर्वांनी ट्रेनमध्ये केक कट करुन तिला ओवाळले आहे. तसेच तरुणीला गोड-गोड पदार्थ खाऊ घातले आहे. तिला एक छानसे गिफ्ट देखील दिले आहे. शिवाय छान असे फोटे सेशनही करण्यात आले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
तंदूरी धमका! स्पेस स्टेशनवर चीनी अंतराळवीरांकडून जिरो ग्रॅव्हिटीमध्ये पहिले बारबेक्यू, Video Viral
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @two_little_hearts_27 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. हा व्हिडिओ अनेकांच्या पंसतीस पडत आहेत. लोकांनी मैत्रीणींचे कौतुक केले आहे. एका नेटकऱ्याने आयुष्याचा एक प्रवाह असाही अशी प्रतिक्रिया दिली आहे, तर दुसऱ्या एकाने हळद पण होऊन जाऊद्यात असे म्हटले आहे. यापूर्वी देखील एका तरुणीचे मुंबई लोकमध्ये केळवण करण्यात आले होते. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
ट्रम्पचा मलेशियात अतरंगी अंदाज! विमानतळावर उतरचा केला डान्स ; VIDEO तुफान व्हायरल
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






