Reset New Beginning! प्रदर्शनानंतर नेपाळचे Gen Z दिसले रस्ते साफ करताना, लुटलेले सर्व सामान केले परत; Video Viral
नेपाळमधील भ्रष्टाचाराविरुद्ध जनरल झेडने देशभर आंदोलने केली ज्याने संपूर्ण नेपाळच काय तर जग हादरलं. काळासोबतच या आंदोलनाने पुढे इतके मोठे रूप धारण केले की नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अनेक गाड्या जाळण्यात आल्या, दुकाने लुटण्यात आली आणि हा गोंधळ काही थांबण्याचा नावच घेत नव्हता. नेपाळमधील या घटनांचे अनेक व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत मात्र नुकताच नेपाळमधील जनरल झेडचा एक नवीन आणि अनोखा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे ज्यात ते रस्ते साफ करताना आणि लुटलेलं सर्व सामान परत करताना दिसून आले. जनरल झेडचे हे बदलेले रूप पाहून आता सर्वच अचंबित झाले असून याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ माजवत आहे.
वादग्रस्त सोशल मीडिया बंदी आणि दीर्घकाळ चाललेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात काठमांडूमध्ये सोमवारी सुरू झालेल्या निदर्शनांचे रूपांतर गोंधळात झाले. सोमवारी सुरक्षा दलांनी केलेल्या कठोर कारवाईत सरकारी इमारती जाळण्यात आल्या, राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ला करण्यात आला आणि किमान १९ लोकांचा मृत्यू झाला. मंगळवारी पंतप्रधानांनी राजीनामा दिला आणि देश राजकीय अस्थिरतेत गेला.
After Bangladesh protests also “Youth” had done cleaning drives, traffic management to earn back legitimacy. Same being done by “Gen Z” in Nepal. The script is now getting so boring. Hire a new scriptwriter pls
— Monica Verma (@TrulyMonica) September 10, 2025
पण काही तासांनंतरच, एक वेगळेच दृश्य उलगडण्यास सुरुवात झाली. तरुण, ज्यांपैकी बरेच जण निदर्शनांमध्ये सहभागी झाले होते, ते हातमोजे आणि मास्क घालून, पोत्या घेऊन आणि राजधानीच्या रस्त्यांवर झाडू मारताना दिसले. एक्सवरील @TrulyMonica आणि इंस्टाग्रामवरील @memepgirl61 अकाऊंटवर मोठ्या प्रमाणात शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये तरुण कचरा उचलताना, रस्ते साफ करताना आणि खराब झालेल्या सार्वजनिक जागांमधून जळालेले अवशेष काढताना दिसत आहेत. काठमांडूच्या उपनगरातील कीर्तिपूरमध्ये येथे बुधवारी सकाळीच जनरल झेडने स्वच्छता मोहीम सुरू केली. याचे व्हिडिओज आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक याला नेपाळच्या नवी सुरुवातीचे प्रतीक मनात आहेत.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.