(फोटो सौजन्य: X)
जंगलात नेहमीच लढतीचे अनेक थरारक आणि नवनवीन घटना घडून येत असतात. लढतीचे हे दृश्य इतके रंजक असते की याचे व्हिडिओज नेहमीच सोशल मीडियावर चांगलेच ट्रेंड करतात. आताही इथे असाच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एक पाणघोडा आणि मगर एकमेकांच्या आमने-सामने भिडताना दिसून आले. संपूर्ण पाण्यावर आपले राज्य मांडून बसलेली मगर पाण्याचा राक्षस म्हणून ओळखली जाते. मगरीच्या शिकारीचे अनेक व्हिडिओज याआधीही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत पण पाणघोड्यासोबतची तिची ही लढत सध्या जास्तच लक्ष वेधून घेत आहे. दोघांमधील या जबरदस्त लढाईत नक्की कोण कुणावर बाजी मारेल हे जाणून घेण्यासाठी युजर्स व्हिडिओला खिळून राहतात. चला नक्की काय घडलं ते जाणून घेऊया.
काय घडलं व्हिडिओत?
जंगलाचे जग असे आहे की जिथे आपण दररोज जीवन आणि मृत्यू यांच्यातील लढाई पाहतो. लहान प्राणी मोठ्या आणि धोकादायक प्राण्यांचे बळी बनतात, परंतु काही प्राणी असे आहेत जे त्या धोकादायक प्राण्यांशीही लढतात. व्हायरल व्हिडिओमध्ये नदीकिनारी एक पाणघोडा आणि त्याच्या समोर तीक्ष्ण नजर ठेवून बसलेली मगर आमने सामने भिडत असल्याचे दिसून येते. मगर शिकारीच्या उद्देशाने प्रथम पाणघोड्याला घाबरवू पाहते पण पाणघोडा क्षणातच आपल्या किंचाळीने मगरीवर असा हल्ला करतो की मगर घाबरून चार पाऊले मागे जाते. पाणघोड्याची ताकद पाहून ती घाबरते आणि उलटे पाय घेऊन गुपचूप तिकडून आपला पळ काढते. मगरीची ही भीती आणि लगेच तिने काढलेला हा पळ पाहून युजर्स अचंबित झाले आहेत. मगरी सारखा शिकारी पाणघोड्याला घाबरू शकतो ही गोष्ट सर्वांसाठीच नवी आहे ज्यामुळे लोक या दृश्यांनी थक्क झाले असून वेगाने व्हिडिओला शेअर करत आहेत.
Everyone recognizes a psycho when they see one pic.twitter.com/ZQY1gcYhHo
— Nature is Amazing ☘️ (@AMAZlNGNATURE) September 9, 2025
पाणघोडा आणि मगरीमधील हा संघर्ष @AMAZlNGNATURE नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हिप्पो इतका त्रासदायक कधीपासून झाला” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हिप्पो कोणालाही घाबरत नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “पाणघोडे हे भयानक प्राणी आहेत”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.