
रोबोटला डान्स करताना पाहताच लोकांनी हा क्षण टिपण्यासह सुरुवात केली आहे. याचा व्हिडिओ काही वेळातच सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या क्षणाने टेक फेस्टिव्हलमधील परफॉर्मन्सची व्याख्याच पूर्ण बदलली आहे. रोबोट अगदी तंतोतंड, लयबद्ध, आणि आत्मविश्वासपूर्ण धुरंधरच्या गाण्यावर डान्स करत आहे. गाण्याच्या प्रत्येक बीट सोबत रोबो जुळवून घेक आहेत. त्याच्या स्टेप्स पाहून, पोझेस पाहून टेक फेस्टमधील लोकही थक्क झाले आहेत. मुंबईतील टेक फेस्टहा आशियातील IIT क्षेत्रातील मोठा टेक फेस्ट मानला जातो. रोबोटच्या या परफॉर्मन्सने या टेक फेस्टची व्याख्याचा बदलली आहे. हा ह्यूमनॉइड रोबोटिक्समधील मोठा विजय मानला जात आहे.
व्हायरल व्हिडिओ
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
व्हायरल होत असलेला व्हिडिओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकजण थक्क झाले आहे. लाखो लाईक्स आणि व्ह्यूज या व्हिडिओला मिळत आहे. शिवाय बॉलीवूडच्या बहुचर्चित धुरंधर चित्रपटाची क्रेझही लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील FA9LA हे गाणेच केवळ लोकप्रिय झाले नसून यामधील अभिनेते रणवीर सिंग आणि अक्षय खन्ना यांच्या भूमिका देखील हिट ठरल्या आहेत. यामुळे धुरंधर चित्रपटही मोठा हिट ठरला आहे.
सध्या या रोबोटच्या व्हिडिओने लोकांना भुरळ पाडली आहे. या व्हिडिओवर कमेंट्स करताना नेटकऱ्यांनी किती गोडी, अद्भुत, अविश्वसनीय, अशा प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड धुमाकूळ घातला आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.