(फोटो सौजन्य – Instagram)
काय घडलं व्हिडिओत?
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, रिपोर्टर एका व्यक्तीला चित्रपटाबाबत प्रश्न विचारताना दिसतो. व्यक्ताचे नाव हबीब जान बलोच असे आहे, व्हिडिओतील दाव्यानुसार हा व्यक्ती रेहमान डकैतचा खूप जवळचा मित्र मानला जात होता. रिपोर्टर त्याला विचारतो की, तुमच्या मित्रावर भारताने एक चित्रपट बनवला आहे तुम्ही तो पाहिला का? यातील रहमानच्या भूमिकेविषयी तुम्ही काय सांगाल. प्रश्नाला उत्तर देताना तेसांगतात की त्यांनी दोन वेळा चित्रपट पाहिला आहे आणि त्यांना चित्रपट फार आवडला. त्यांनी रहमान डकैतवर इतका चांगला चित्रपट बनवल्याबद्दल भारताचे, बॉलिवूडचे आभार मानले.
ते चित्रपटाच्या तंत्राचे, कथेचे आणि सादरीकरणाचे कौतुक करतात. तथापि, ते असेही म्हणतात की जर चित्रपटात एक-दोन चांगली गाणी असती तर तो अधिक आनंददायी झाला असता. हबीब जान बलोच यांनी त्यांच्या विधानात डकैत रहमान यांचे वर्णन एक हिरो म्हणून केले. ते म्हणतात की चित्रपटात त्यांना खलनायक म्हणून दाखवण्यात आले असले तरी, प्रत्यक्ष जीवनात ते तसे नव्हते. “पाकिस्तान जे सत्य दाखवू शकले नाही, ते भारताने दाखवून दिले आहे”. हबीब जान बलोच म्हणतात की “धुरंधर” चित्रपटात रेहमान डकैतच्या जीवनातील असे पैलू दाखवले आहेत जे पाकिस्तान कधीही पुरेसे दाखवू शकले नाही. त्यांचा असा विश्वास आहे की भारतीय चित्रपटांनी अधिकृत कथा आणि स्थानिक कथा अनेकदा लपवलेले सत्य उघड केले आहे.
हा व्हिडिओ @the_verifiedsource नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “अक्षय खन्नाला सलाम, त्याच्या अभिनयाने आम्हाला विसरायला लावले की रेहमान डकैत खलनायक आहे ” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “या माणसावर पॉडकास्ट ठेवायला हवा, त्याच्याकडे फार रंजक माहिती आहे जी ऐकायला नक्कीच आवडेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “हा माणूस धुरंधरमध्ये दाखवल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मान्यता देत आहे… पाकिस्तान आणि अनेक इस्लामिक देशांमध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली आहे हे दुःखद आहे, पण शेवटी सर्वांना तो सर्वत्र दिसेल”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






